आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 शिवचरित्रकार डॉ शिवरत्न शेटे रविवारी सावंतवाडीत..

 

*🟥 राजवाड्यात ‘प्रतापगडाचा रणसंग्राम’ वर व्याख्यान ; सिंधुमित्र प्रतिष्ठानचे आयोजन*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२५:-*सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या ६ व्या शिवजागराच्या निमित्ताने रविवारी २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सावंतवाडीतील

राजवाड्यात प्रतापगडाचा रणसंग्राम या शिव व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिध्द शिवचरित्रकार तथा हिंदवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ शिवरत्न शेटे महाराजांच्या प्रतापगडावरील अजरामर पराक्रमांची व अंगावर रोमांच उभी करणारी शौर्यगाथा धगधगत्या शब्दात मांडणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य, स्वधर्म, स्वप्रजा यांच्या रक्षणार्थ पराक्रमाने ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापन केले. सर्वांचे आराध्य दैवत असलेल्या राजे

महाराजांनी स्वराज्यासाठी केलेल्या पराक्रमाचे व त्यांच्या तेजस्वी कामगिरीचे अनेक गड व किल्ले साक्षीदार आहेत. त्यात महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील तोरणा, राजगड, रायगड, पन्हाळा, सिंहगड, शिवनेरी, विशाळगड, सिंधुदुर्ग यासह जिंजी पावेतो कित्येक गड व किल्ले यांचा समावेश आहे.

गड व किल्ल्यांच्या याच शौर्यशाली श्रृंखलेत प्रतापगडाचे महत्व काकणभर सरसच असुन हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या प्रवासात महाराजांनी या गडावर अनेक हल्ले, संकटांचा निधड्या छातीने मुकाबला करत विजयी पताका फडकावली. लोखंडी पहारही वाकवण्याची ताकद असलेल्या विजापूरच्या आदिलशाहीतील बलाढ्य सरदार अफजल खानाचा पराभवही महाराजांनी याच गडावर धैर्य, युक्ती व शक्तीच्या जोरावर केला.

अजरामर पराक्रमांची व अंगावर रोमांच उभी करणारी ही शौर्यगाथा प्रत्येक स्वाभिमानी राष्ट्रभक्तास माहीत असायलाच हवी. त्यामुळे इतिहासातील ‘सर्वोत्कृष्ट युध्द’ असे बिरुद असलेल्या या रणसंग्रामातील बारकावे ऐकण्यासाठी शिवप्रेमींसह सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन सिंधुमित्र प्रतिष्ठानच्यावतीने डॉ प्रविणकुमार ठाकरे यांनी आहे.

या प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवजागराचे यापूर्वी रयतेचे राजे शिवराय आमुचे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब, महाराजांची आग्र्याहून सुटका, नरवीर शिवा काशीद व बाजीप्रभू देशपांडे असे ५ पुष्प सादर करण्यात आले. आबाल वृद्धांचा या शिवजागरांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यामुळे रविवारचे ६ वे पुष्पदेखील ऐतिहासिक राजवाड्याच्या साक्षीने सिंधुदुर्गवासीयांच्या गर्दीने बहरेल, अशी आशा आहे.

 

फोटो डॉ शिवरत्न शेटे

 

डॉ शिवरत्न शेटे हिंदवी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष असून त्यांचा शिवचरित्राचा सखोल अभ्यास महाविद्यालयीन जीवनापासून आजतागायत सुरूच आहे. आपल्या ओघवत्या वाणीच्या शिव व्याख्यानातून प्रत्यक्ष शिवसृष्टी उभारण्याचे कसब त्यांच्यात आहे. समकालीन बखरीसह इतिहासाचार्यांच्या भेटी व त्यांच्या लेखनाचा अभ्यासही त्यांनी केला आहे. तसेच राजे प्रत्यक्ष ज्या भागासह ज्या मार्गाने गेले त्याचाही त्यांनी प्रत्यक्ष अभ्यास केला आहे. त्यांच्या प्रतिष्ठान मार्फत दरवर्षी जुलै महिन्यात पन्हाळा ते पावनखिंड तर हिवाळ्यात विविध गडकिल्ल्यांवर दोन मोहिमा आयोजित केल्या जात असुन यात हजारो शिवभक्त सहभागी होतात. तसेच शेतकरी आत्महत्या प्रबळ भागात शिवचरित्राच्या माध्यमातून संकटांचा सामना कसा करावा याबाबत ते व्याख्याने देऊन त्यांच्यात जगण्याची उमेद जागवतात.

 

 

*_………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

____________________________

 

_आपल्या अडचणीच्या जागेत बोअरवेल 💧खोदायची आहे त्यासाठी एकमेव पर्याय *💦”श्रीराम बोअरवेल्स”💦*_

 

*🚰श्रीराम बोअरवेल्स-सावंतवाडी💧*

 

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*

 

◾आमच्याकडे अडचणीच्या ठिकाणी 300 फूट लांब गाडी उभी करून, मोठे होल ६” (इंच) बोअरवेल 500 फुटापर्यंत खुदाई करून मिळेल…!💦

 

◾आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक मशीन द्वारे 1500 फुटापर्यंत बोअरवेल व विहिरीचा पॉईंट सर्वे करून मिळेल…!💦

 

◾आम्ही इलेक्ट्रॉनिक मशीनने सर्वे केलेल्या बोअरवेल पॉईंटला पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी 3000 ते 5000 लिटर पाण्याची 100% गॅरन्टी (हमी) दिली जाते…!💦

 

◾तसेच ग्राहकांनी आमच्याकडून बोअरवेलसाठी पाणी सर्वे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न लागल्यास नियम व अटी नुसार 100 % रक्कम 90 दिवसांनी परत दिली जाईल…!💦

 

◾बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल व आमच्या ॲग्रीमेंट पेपरवरती आपली सही घेतली जाईल…!💦

 

◾आमचेकडे बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण 24 महिने पाण्याची गॅरंटी दिली जाईल. व 24 महिने बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्या बदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई करून मिळेल, ही ग्राहकांनी नोंद घ्यावी…!💦

 

◾आमचेकडे पंपसेटला 2 वर्ष (24 महिने) गॅरंटी दिली जाते व 1 वर्ष फ्री-सर्वीस दिली जाते व त्यानंतर सर्विस चार्ज घेतला जातो तसेच पंपसेट 2 वर्षापर्यंत खराब झाल्यास दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटी मध्ये फिटिंग करून दिला जातो व फक्त सर्विस चार्ज रुपये 1000/- घेतले जाईल…!💦

 

◾आमचेकडून पंपसेट फिटिंग करून घेतल्यास व 1 वर्षात पंपसेट अडकल्यास पंपसेट फ्री मध्ये काढून तसेच संपूर्ण बोअरवेल साफ (फ्लशिंग) करून दिली जाईल…!💦

 

◾आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा 4″/6″ सबमर्सिबल पंपसेट, डोमेस्टिक पंप, ओपेनवेल पंप, जुना पंपसेट योग्य दरात 2 वर्ष गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा…!💦

 

👉( टीप:- नियम व अटी लागू)

 

_तसेच_

 

*🛑आमच्याकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीची संपूर्ण पाहणी करून मिळेल. (700 फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेलची पाहाणी फक्त रु. 3000 रूपयात करून देऊ…!)*

 

*🛑जुने बोअरवेल अडचणीच्या ठिकाणी 300 फुटापर्यंत लांब गाडी बाहेर उभी करून बोअरवेल साफ करून मिळेल व हवे असल्यास खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेला पंपसेट योग्य दरात काढून मिळेल…!*

 

*📱संपर्क – 👇*

*9420293799*

*7774851004*

*7768898659*

*7588570587*

*9422874647*

 

 

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!