कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥सरपंचांनी लोकसहभागातून योजना प्रभावीपणे राबवाव्यात!

 

*🟥ग्रा.पं. प्रशिक्षणात कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कणकवली, दि.२५:* गावच्या सर्वांगीण विकासाचे व्हिजन सरपंचांकडे असले पाहिजे. गावात शासनाच्या विविध योजना सरपंचांनी लोकसहभागातून प्रभावीपणे राबविल्या पाहिजेत. गावाच्या शाश्वत विकासाचे ध्येय पूर्ण करण्यासाठी सरपंचांनी सर्वांना सोबत घेऊन प्रयत्न करावेत, असे आवाहन कणकवली पंचायत समितीचे कृषी अधिकारी सुभाष पवार यांनी केले.

 

आर. आर. (आबा) सुंदर गाव पुरस्कार योजनेंतर्गत जिल्ह्यातील पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींच्या सरपंच, ग्रा.पं. सदस्य, ग्रामसेवक व बचत गटाच्या अध्यक्ष यांच्यासाठी यशदाचे उपसंचालक डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली येथील शिवशक्ती हॉलमध्ये आयोजित तीन दिवसीय प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी यशदाचे एन. टी. देसले, यशदाच्या कोकण विभागाचे सत्र समन्वयक शिरीष कुलकर्णी, मालवणकर उपस्थित होते.

देसले म्हणाले, सरपंचांनी आपले गाव आदर्श बनविण्यासाठी व्यापक स्वरुपात प्रयत्न करणे गरजेचे आहे. गावच्या विकासासाठी शासनाच्या

 

विविध योजना आहेत. या योजना सरपंचांनी लोकसहभागातून प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्याने याठिकाणी पर्यटनावर आधारित विविध उपक्रम राबविण्यास वाव आहे. त्यामुळे याठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक पर्यटनासाठी येतील. सरपंचांनी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन विकासकामे केली पाहिजेत. आपल्या गावाचा विकास आराखडाही सरपंचांनी तयार केला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आर. आर. (आबा) सुंदर गाव पुरस्कार योजनेत सिंधुदुर्गातील ज्या ग्रामपंचायतींना पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्या गावच्या सरपंचांनी या योजनेंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

प्रशिक्षण शिबिराला जिल्हयातील वानिवडे, मळेवाड-कोंडुरे, साकेडी, कुंदे, आंबेरी, कोचरा, कुडासे खुर्द, उंबर्डे या ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रा.पं. सदस्य, ग्रामसेवक, बचत गटांचे अध्यक्ष उपस्थित होते. दरम्यान, प्रशिक्षणात स्पीकर माईक व्यवस्थेसह अन्य काही उणीवा असल्यामुळे प्रशिक्षणार्थीनी नाराजी व्यक्त केली.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!