आणखीकोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

🟥पालकरवाडी येथील जळीतग्रस्त बागेचा अद्याप पंचनामा नाही

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 वेंगुर्ले, दि.२२:* वेंगुर्ले तालुक्यातील पालकरवाडी शंभू भवानी स्टॉपजवळील आंबा, काजू बागेस शॉर्टसर्किटमुळे आग लागून तेथील तीन शेतकऱ्यांचे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. सदर घटना घडून पाच दिवस उलटले तरी शासनाकडून त्याचा अद्याप पंचनामा करण्यात आलेला नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून तीव्र शब्दात संताप व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, मंगळवार १४ फेब्रुवारी रोजी दुपारी दीडच्या सुमारास पालकरवाडी शंभू भवानी स्टॉ पजवळील आडेली सबस्टेशन येथे शॉर्टसर्किट होवून सदानंद राजाराम धुरी यांची २५ काजू व आंबा कलमे, गोखले एज्युकेशन सोसायटी यांची ७० काजूची मोठी कलमे व प्रकाश सहदेव तळकर यांची १० काजू कलमे आगीत जळून सुमारे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. वरील आंबा, काजू बागायतदार शेतकऱ्यांच्या बागेतून ११ केव्हीची लाईन गेलेली आहे. सदर लाईन अवधी सहा फूट उंचीवर आहे. त्यामुळे शॉर्टसर्किट होवून ही आग लागल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

ही घटना घडल्यावर पाच सहा दिवस उलटले तरी शासनाचे कोणीही अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, पोलीस पाटील यापैकी कोणीही फिरकले नाहीत. पंचयादी केली नाही. फक्त पालकरवाडी सरपंच सदाशिव पाटील व वीज वितरणचे अभियंता गणेश तोंडले हे पहाणी करुन गेले. त्यामुळे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

_सावंतवाडीतील प्रसिद्ध वडापाववाले 👨🏻‍🍳 *शेटकर बंधू* पुन्हा एकदा सावंतवाडीकरांसाठी उपलब्ध *🍔संजू वडापाव सेंटर👨🏻‍🍳*_

 

*🎥KOKAN LIVE BREAKING NEWS CHANNEL*

 

*☕चहा*

*🧋कॉफी*

*🍔वडापाव*

*🥠समोसा*

*🧇कटलेट*

*🧅कांदा भजी*

*🥔बटाटा भजी*

*🌶️मिर्ची भजी*

*🍲भाजी पाव*

*🍛मिसळ पाव*

*🍗चिकन पाव*

_आणि अन्य बरेच काही उपलब्ध.🥳😍._

 

*👨🏻‍🍳आमचा पत्ता:-*

*संजू वडापाव सेंटर*

_दत्त भेलच्या बाजूला, श्री पंचम खेमराज कॉलेज रोड,मोतीतलाव जवळ सावंतवाडी_

*📱संपर्क:-*

9422394123

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!