🟥 स्वराज्य स्थापन करून एक आदर्श प्रशासन कसं करावं याचं उत्तम उदाहरण जगासमोर ठेवणाऱ्या शिवरायांच्या जयंती दिवशी मळगावच्या ग्रामसचिवालय इमारतीचे उद्घाटन हा सुवर्णयोग..
*🟥 ग्रामसचिवालय हे गावाच्या विकासाचे केंद्र असून गावाच्या विकासासाठी निधी देणे हे लोकप्रतिनिधिंचे कर्तव्य ; आम.नितेश राणे*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*
*🎴सावंतवाडी, दि-१९:-* केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या भाषणात सरपंच हा गावाचा मुख्यमंत्री तर ग्रामपंचायत म्हणजे गावाचे मंत्रालय आहे असा उल्लेख केला होता. म्हणजेच ग्रामसचिवालय हे गावाच्या विकासाचे केंद्र आहे. त्यामुळे गावातील सर्वसामान्य ग्रामस्थ ज्या अपेक्षेने ग्रामपंचायतीत येईल ते त्यांचं काम त्वरित पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे. जेणेकरून गावातील लोकांच्या जीवनात परिवर्तन करण्यासाठीच या ग्रामसचिवालयाच्या माध्यमातून काम केलं जावं, असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केले. तसेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून एक आदर्श प्रशासन कसं करावं याचं उत्तम उदाहरण जगासमोर ठेवलं. त्या शिवरायांच्या जयंती दिवशी मळगावच्या ग्रामसचिवालय इमारतीचे उद्घाटन होत आहे हा सुवर्णयोग असल्याचे सांगितले.
मळगाव ग्रामसचिवालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, सावंतवाडी तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे, सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती राजू परब, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, मळगाव सरपंच सौ. स्नेहल जामदार, उपसरपंच हनुमंत पेडणेकर, ग्रामविकास अधिकारी संदीप गोसावी, माजी सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, निलेश कुडव, विजयानंद नाईक, तेजपाल सावळ, भाऊ देवळी, अशोक बुगडे, चंद्रकांत जाधव, गुरुनाथ गावकर, दादा परब आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना त्यांनी, “ज्यावेळी आमदार खासदार मंत्री वा अन्य लोकप्रतिनिधी आपल्याकडे येतात किंवा आपण त्यांच्याकडे जातो त्यावेळी आपल्या गावाच्या विकासासाठी आवश्यक निधीची मागणी आपण हक्काने करायला हवी. तुम्ही हक्काने मागा तुम्हाला ते देणं हे लोकप्रतिनिधी म्हणून आमचं कर्तव्य आहे. आज भारतीय जनता पार्टी सत्तेत आहे. तुमचे स्थानिक आमदार दीपक केसरकर हे राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आहेत. त्यामुळे सत्ताधारी पक्षाची ग्रामपंचायत या नात्याने गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देऊ नका. आज ग्रामविकास मंत्री म्हणून गिरीश महाजन चांगले काम करीत आहेत. फक्त माझ्या कणकवली मतदारसंघात सध्या २१० कोटींची कामे सुरू आहेत. त्यामुळे तुम्हीही तुमच्या लोकप्रतिनिधींकडून हक्काने विकास कामांसाठी निधी मागून घ्या तुमची काम करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.
जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी म्हणाले, ग्रामसचिवालय हे जनसेवेचे केंद्र असून या ग्रामसचिवालयाच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी हातभार लागायला हवा. ग्रामसचिवालयाची ही इमारत सर्वसामान्य जनतेच्या कामांचा केंद्र ठरायला हवी. त्यामुळे ज्या जनतेने आपल्याला निवडून देऊन आपल्या विकासाची जबाबदारी दिली त्या जनतेचा विकास हाच ध्यास मानून गावाला अभिमान वाटेल असं काम करा, असे आवाहन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले.
तत्पूर्वी राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय अध्यक्ष अर्चना घारे यांनी ग्रामसचिवालय इमारतीला भेट देत शुभेच्छा दिल्या. ग्रामविकासाचे काम करीत असताना पक्षीय हेवेदावे दूर सारून सर्वांनी एकत्र येऊन गावाचा विकास करायला हवा. सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सर्वसमावेशक असे निर्णय घेऊन जनतेला अपेक्षित विकास साधा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
ग्रामसचिवालय नूतन इमारत उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने ग्रामपंचायत स्थापनेपासूनच्या आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्राम विस्तार अधिकारी, तलाठी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा ताई व अन्य कर्मचारी यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. तसेच गावाच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या लोकप्रतिनिधींचाही यावेळी सत्कार करण्यात आला. मळगाव गावातील दशावतार कलाकार तसेच विविध क्षेत्रात नावलौकिक केलेल्या ग्रामस्थांचा तसेच गावाच्या विकासात मोलाचा सहभाग देणाऱ्या पण हयात नसलेल्या लोकप्रतिनिधींच्या कुटुंबातील सदस्यांनाही यावेळी गौरविण्यात आले.
या उद्घाटन प्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, दर्शना बाबर देसाई त्यांनीही उपस्थित राहत शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला मळगाव चे ग्रामपंचायत सदस्य आनंद देवळी, लक्ष्मण गांवकर, प्रेमनाथ राऊळ, तुकाराम सावळ, लाडू जाधव, निकीता बुगडे, निकीता राऊळ, सुभद्रा राणे, रत्नमाला तळकटकर, अनुजा खडपकर, स्वरूपा राऊळ, मळगाव चे माजी सरपंच अशोक बुगडे, विजयानंद नाईक, तेजपाल सावळ, अर्जुन देवळी, अर्चना जाधव, कृष्णा गावडे, निलेश कुडव, गणेश प्रसाद पेडणेकर, माजी उपसरपंच अक्षया राऊळ, माजी तंटामुक्त समिती अध्यक्षा सौ. मिनल तेली, महेश तेली, महेश खानोलकर, शेखर पाडगावकर, बाळू साळगांवकर, माजी ग्रा.प. सदस्य गजानन सातार्डेकर, गुरुनाथ गांवकर, रामचंद्र केळुसकर, पांडुरंग राऊळ, बाप्पा नाटेकर, नंदकिशोर राऊळ, टिळक सावळ, विश्वनाथ गोसावी, सिद्धेश तेंडुलकर, विशाल डुबळे, निलेश चव्हाण, निलेश राऊळ, ए.आर. वारंग, दिपक जोशी, अरुण शर्मा, प्रसाद नाईक, सूरज राऊळ, दयानंद मातोंडकर, संदेश नार्वेकर, तुषार वालावलकर, आदेश परब यांसह ग्रामपंचायतचे लिपिक हरिश्चंद्र आसयेकर, कर्मचारी राजन राऊळ, गुंडू गांवकर, देवा राऊळ, पूजा आजगांवकर, शशिकला तळकटकर, विद्या कळंगुटकर यांसह गावातील ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला आमदार नितेश राणे यांनी या कार्यक्रमानंतर अभिवादन केले.मळगाव ग्रामसचिवालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्या प्रित्यर्थ मळगाव गावात आलेले आमदार नितेश राणे यांनी मळगाव शिवाजी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शिवजयंती निमित्त या ठिकाणी होत असलेल्या सोहळ्याला ही त्यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, प्रमोद गावडे राजू परब सरपंच स्नेहल जामदार उपसरपंच हनुमंत पेडणेकर तसेच अन्य लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी भिल्लवाडी मंडळाच्यावतीने आ. नितेश राणे यांचे पांडुरंग राऊळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वागत केले. यावेळी शिवप्रेमी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_सावंतवाडीनंतर आता कुडाळ शहरात_*
🪄 *एस. एम. मडकईकर* 🪄
🏵️सुवर्णकार 🏵️
*_🪙1 ग्रॅम दागिन्यांचे शोअरूम⭐_*
*🌟एस. एम. मडकईकर ”1 ग्रॅम गोल्ड ऑफर”…🌟*
💫ऑफर:- 4 ते 20 फेब्रुवारीपर्यंत मर्यादित💫
*🔷3 हजारांचे ‘मंगळसुत्र’ फक्त 2200/- रू*💰
*_🔷4 हजारांचे पाच पदरी मंगळसूत्र 3200 /-रू*💰
🔷 *3 हजारांचा ‘राणी हार’ 2200/-रूपयांत* 💰
🌟वरील तिन्ही वस्तुंवर गणपती किंवा लक्ष्मीच्या मुर्तीचा *”सिल्वर शो पीस”* मोफत 🌟
*🪄अडीच हजारांचा ‘नेकलेस सेट’ फक्त 1800/- रूपयात*💰
*🪄3 हजारांचा काकणांचा सेट 2000/- रुपयात* 💰
🌟1 ग्रॅम गोल्डचे गोवा व महाराष्ट्रीयन पद्धतीचे दागिने मिळतील🌟
🌟गोवा पद्धतीच प्लेन मंगळसूत्र 40 इंच लांबीचे मिळेल🌟
🌟पोक्यांचे हार, पोक्यांच्या बांगड्या मिळतील🌟
🌟गोव्यातील गळसरी, कडकड्याची पाती, सुरंगीचा वळेसर,आंबाड्याचे क्लिप, पोके, कान मिळतील🌟
🌟1 ग्रॅम गोल्ड दागिन्यास 6 महिन्याची गॅरंटी🌟
🌟एक्सचेंज वेळी स्वीकारली जाईल 30% रक्कम🌟
🌟1 ग्रॅम गोल्ड वस्तूवर रिप्लेसमेंट ऑफर🌟
🌟1 ग्रॅम मंगळसूत्र, हार बनवून मिळेल.(2 वर्षांच्या गॅरंटीसहीत)🌟
🌟एक ग्रॅम गोल्डचे ब्रेसलेट व चेन सुद्धा मिळतील🌟
*_🪙बेन्टेक्सचे दागिने देखील मिळतील…!⭐_*
✨सिल्व्हर इटालीयन 💍लेडीज & जेंन्टस अंगठ्या💍 उपलब्ध✨
*🛣️पत्ता:-* एस. एम. मडकईकर सुवर्णकार, पानबाजार, स्टेट बँकेच्या बाजूला, कुडाळ
*⭐एस. एम. मडकईकर, सुवर्णकार⭐*
✨प्रोप्रा. शामसुंदर मडकईकर✨
*📲संपर्क:-*
विराग मडकईकर
📲8411930437
वैष्णवी मडकईकर
📲7796695448
🌟✨⭐🪄🌟✨⭐🪄🌟✨⭐
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

