आ. भास्करराव जाधव यांचे शृंगारतळीत जंगी स्वागत..

▪️बाजारपेठेतील रस्ता, पुलाच्या कामाची केली पाहणी..

▪️व्यापाऱ्यांसह नागरिकांनी समाधान व्यक्त करून मानले आभार..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण,दि.२८: गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण कामात शृंगारतळी बाजारपेठेत निर्माण झालेला रस्त्याच्या उंचीचा प्रश्न आ. श्री. भास्करराव जाधव यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून केवळ एका बैठकीत सोडवला. बैठकीत निर्देश दिल्यानुसार प्रत्यक्ष काम सुरू झाले. त्यानंतर आज गुहागरला जात असताना शृंगारतळीमधील व्यापारी व नागरिकांनी त्यांना थांबवून ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करून त्यांचे जोरदार स्वागत केले. व्यापारी व नागरिकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. केवळ आपल्यामुळेच बाजारपेठेतील छोटा-मोठा व्यापारीवर्ग उद्धवस्त होण्यापासून वाचला आहे, असे उद्गार व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री. अजित बेलवलकर यांनी काढले. यावेळी आ. श्री. जाधव यांनी देखील बैठकीत ठरल्यानुसार काम होत आहे की नाही, याची संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली, शिवाय स्वतः चालत जाऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. अगदी बाजारपेठेत बांगड्या विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलांना कुठे जागा देत आहात? याचीदेखील त्यांनी यावेळी आवर्जून विचारणा केली. कुणाचेही नुकसान होणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचनाही त्यांनी अधिकारी, ठेकेदार यांना केली. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

*_🔥सावंतवाडीकरांसाठी खुशखबर..🔥_*

*🤷🏻‍♂️सावंतवाडीत प्रथमच सर्व प्रकारच्या🥻साड्या रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करून मिळण्याची सुविधा..🤷🏻‍♀️*

*_🥻साड्यांना रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करायच्या आहेत? मग गोवा बेळगावला पाठविण्याची गरज नाही!🙅🏻‍♂️_*

*🏬नाईक काॅम्पलेक्स खासकीलवाडा गाळा नं २, शाळा नं. ४ च्या खाली असलेल्या रसीक लाॅंड्री मध्ये आपले कपडे द्या! व निवांत रहा!💃*
🧥🥼🦺👚👕👖👔👗👘

_💫सुट शेरवानी, शर्ट, पॅन्ट ड्रायक्लिनींग व प्रेस करून मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे *रसीक लाॅंड्री..*_

*⚡संर्पक : अमीत राऊळ*
*📱मोबाईल : ९६५७०९०९२७*
*📱व्हाट्सअप : ९४०५०६०९३७*

*_💥त्याचप्रमाणे आमच्याकडे सर्व प्रकारचे घाऊक पीठ उपलब्ध💥_*

        *🔥समृध्दी गृह उद्योग प्रकल्प🔥*
_💫 उत्कृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू, ज्वारी, बेसण, नाचणी, मकापीठ होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.._

*🏬आमचा पत्ता :*
नाईक काॅम्पलेक्स, गाळा नं. २, शाळा नं. ४ च्या खाली खगसकीलवाडा, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.

*⚡प्रो.प्रा. अरुण गावडे*
*📱मोबाईल : ८२७५०३७४०८*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!