कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

आंबोली येथील सैनिक स्कूल मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू, ऑनलाईन सेवाही उपलब्ध 

आंबोली येथील सैनिक स्कूल मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू, ऑनलाईन सेवाही उपलब्ध

समर कॅम्पचे आयोजन, विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, संस्थेचे आवाहन…

सावंतवाडी,ता.१३: आंबोली येथील सैनिक स्कूलमध्ये सहावी, सातवी आणि नववी ते बारावी या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान स्कूलच्या माध्यमातून दहा वर्षावरील विद्यार्थ्यांसाठी १५ ते २१ एप्रिल आणि २२ ते २८ एप्रिल या काळात “समर कॅम्प” घेण्यात येणार आहे. यात पिटी, शारीरिक शिक्षण, योगासन, तसेच स्वरक्षण धडे दिले जाणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
याबाबत संस्थेकडून प्रसिद्धी पत्रक देण्यात आले आहे. त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, आंबोली सैनिक स्कूलमध्ये सहावी , सातवी आणि नववी ते बारावी या वर्षासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी प्रत्यक्ष संस्थेत न येता घरबसल्या ऑनलाइन प्रवेश घेऊ शकतात. तसेच दहा वर्षावरील विद्यार्थ्यांसाठी १५ ते २१ एप्रिल व २२ ते २८ एप्रिल अशा दोन टप्प्यात संस्थेकडून “समर कॅम्प ” ही घेण्यात येणार आहे. यात पिटी, शारीरिक शिक्षण, योगासन, स्वरक्षण, मुष्टीयुद्ध सैन्य प्रशिक्षण व युद्ध बचाव तंत्र, आपत्ती व्यवस्थापन, पर्वतारोहण, रॅपलिंग, व्हॅली क्रॉसिंग, पदभ्रमंती, निसर्ग निरीक्षण व गेस्ट लेक्चर आदींचा समावेश आहे. तरी जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा, तसेच अधिक माहितीसाठी दीपक राऊळ- 9423304518, राजेंद्र गावडे- 9403366229, संतोष गावडे- 9423250065 यानंबर वर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!