कोकणमनोरंजनमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी अंगलदार, मंत्रालयीन अधिकारी, कर्मचारी यांचेकरीता नाईट अंडर आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा संपन्न

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी अंगलदार, मंत्रालयीन अधिकारी, कर्मचारी यांचेकरीता नाईट अंडर आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा संपन्न

सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांचा स्तुत्य उपक्रम

सिधुदुर्ग पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांना रोजच्या दैनंदिन कामकाजा पासून काही काळ विरंगुळा
मिळावा, त्यांचेमध्ये सुसंवाद व्हावा, एकोपा निर्माण व्हावा, खिलाडू वृत्ती व कोशल्य याला वाव मिळावा, खेळावी भावना निर्माण व्हावी याकरीता सिंधुदुर्ग पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार, सरोन मंत्रालयिन अधिकारी व कर्मचारी यांचेकरीता . पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांचे संकल्पनेतून व श्री. नितिन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक, सिधुदुर्ग यांचे मार्गदर्शनाखाली नाईट अंडर आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धांचे दिनांक 11/02/2023 दिनांक 12/02/2023 रोजी सायंकाळी 18.00 ते 22.00 या वेळेत पोलीस परेड मैदान येथे आयोजन करण्यात आलेले होते.
सदर स्पर्धेकरीता जिल्हयामधील पोलीस ठाणे, सर्व शाखा व मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी यांच्या मिळून एकुण 22 संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांचे हस्ते पोलीस परेड मैदान येथे पार पडले.
सदरवेळी जिल्हा पोलीस दलामधील पोलीस अधिकारी व अंमलदार व त्यांचे कुटूंबिय उपस्थित होते.
दि. 11.02.2023 रोजी प्रथम फेरीमध्ये एकुण 11 सामने खेळविण्यात आले. दुसऱ्या दिवशी दि. 12.02.2023 रोजी व्दितीय फेरी, तृतीय फेरी, सेमी फायनल व फायनल असे मिळून एकुण 11 सामने खेळविण्यात आले. स्पर्धेमध्ये मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी सहभाग घेतला. स्पर्धेमध्ये 22 संघांचे एकुण 176 खेळाडू यांनी सहभाग घेतला. प्रत्येक संघामध्ये महिला याप्रमाणे एकुण 22 महिलांनी सुध्दा भाग घेतलेला होता. सर्वांनी क्रिकेट स्पर्धेमध्ये उस्फुर्तपणे व 1 खिळाडू वृत्तीने सहभाग घेवून आपले क्रिडा कौशल्य दाखविले. सदर स्पर्धा पाहण्यासाठी मोठया संख्येने पोलीस कुटुंबिय सहभागी झालेले होते. त्यांनी सामना दरम्यान खेळाडूंचा यांना चांगल्या कामगिरीबाबत टाळया वाजवुन प्रोत्साहन दिले.
या स्पर्धेमध्ये झालेल्या सामन्यांमधून मोटार परिवहन विभाग, सिंधुदुर्ग व वैभववाडी पोलीस ठाणे यांची फायनलसाठी निवड झाली. अंतिम सामन्यामध्ये वैभववाडी पोलीस ठाणे संघाने व मोटार परिवहन विभाग संघाचा पराजय करुन विजेतेपद पटकावले तर मोटार परिवहन विभाग संघ उप विजेता ठरला. एकंदरीत दोन दिवस चाललेल्या नाईट अंडर आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेमध्ये विजेता संघ- वैभववाडी पोलीस ठाणे, उपविजेता संघ मोटार परिवहन विभाग, सिंधुदुर्ग, अंतिम सामन्याचा सामनावीर- गणेश भोवड (वैभववाडी पोलीस ठाणे) मालीकावीर अभिजित तावडे (वैभववाडी पोलीस (ठाणे), उत्कृष्ट गोलंदाज भालचंद्र दाभोलकर (मोटार परिवहन विभाग, सिंधुदुर्ग) उत्कृष्ट फलंदाज. अमित निब्रे (मोटार परिवहन विभाग, सिंधुदुर्ग) यांना घोषित करुन सर्वांना चपक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आलेले आहे. सदर स्पर्धेचे आयोजन मानव संसाधन शाखा व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्रा यांनी संयुक्तपणे केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!