करियरमनोरंजनरत्नागिरीसामाजिक

अभिनेत्री ‘ऐश्वर्या नागेश’चा इकरा इंग्लीश मिडीयम संस्थेतर्फे सत्कार..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण,दि.१८: चिपळूणची सुकन्या इकरा इंग्लिश मिडीयम ची माजी विद्यार्थी ऐश्वर्या नागेश हिने झी मराठीवरील देव माणूस या मालिकेत अपर्णाची भूमिका कसदारपणे साकारली आहे. तिच्या अभिनयाचे कौतुक संस्थेच्या वतीने चेअरमन अन्वर भाई पेचकर व महेर पेचकर यांनी तिला या क्षेत्रातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. या वेळी शहराध्यक्ष रतन पवार, युवा कार्यकर्ते फैसल पिलपिले ट्रस्टी जुल्फिकार पेचकर मजहर पेचकर सुमया पेचकर शाळे चे विद्यार्थी यांच्यासह ऐश्वर्याचे आई-वडील उपस्थित होते.

झी मराठी वाहिनीवर सुरु असलेल्या ‘देव माणूस’ या मालिकेतून चिपळूणची सुकन्या, ऐश्वर्या अरुणा प्रकाश नागेश प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिने या मालिकेत डॉक्टरच्या आयुष्यात येणारी नवीन व्यक्ती हे पात्र साकारल असून अपर्णा हे तिच्या भूमिकेचे नाव आहे. ८ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० वाजता तिचा पहिला एपिसोड प्रदर्शित झाला.

विद्यालायात तिचे शालेय शिक्षण पूर्ण झाले असून डी.बी.जे. महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी असलेल्या ऐश्वर्या नागेश हिने महाविद्यालयीन स्तरावरील एकांकिका तसेच मॉडेलिंग अशा विविध स्पर्धांमधून स्वतःला सिद्ध केले आहे. तिने वक्तृत्व, कथाकथन, चित्रकला, रांगोळी, अभिनय अशा विविध स्पर्धांमध्ये आजवर यश मिळवले आहे. एसटी महामंडळातील निवृत्त वाहतूक निरीक्षक प्रकाश नागेश यांची ती कन्या आहे. सध्या ती ए.एल.एस.जे. कॉलेज, कुर्ला येथे मास मीडियाचे शिक्षण घेत आहे. शाळेत असताना तिने सर्वोत्तम मानला जाणारा चतुरंगचा विद्यार्थी गोडबोले पुरस्कार मिळविला होता.

यापूर्वी तिने अनेक एकांकिका, शॉर्ट फिल्ममधून अभिनय केला आहे. तसेच सह्याद्रीवरील ‘भ्रमंती महाराष्ट्राची’ या कार्यक्रमातही तिने निवेदन केले आहे. अनेक फॅशन शो जिंकले आहेत. ‘असंही घडू शकतं’ हे नाटकही तिने केले असून आता ती झी मराठीवरील ‘देव माणूस’ या मालिकेतून दिसत आहे. आपल्या यशामध्ये आई-वडिलांचा मोठा वाटा असल्याचे ऐश्वर्याने सत्कारावेळी सांगितले.

*💥धमाका ऑफर.. धमाका ऑफर.. धमाका ऑफर..💥*

_🔥राऊत आणि कंपनी, रोवस्त्र, राऊत क्लाँथ सेंटर दिवाळी साठी कपड्यावर घेऊन आले आहे! खास धमाका ऑफर……!💥_

*💥😍 दिवाळी धमाका ऑफर 😍💥*

*🔥राऊत क्लाँथ सेंटर*
_ड्रेस मटेरिअल, टाँप, जिन्स_
फक्त ₹ १९९ पासून ड्रेस मटेरियल उपलब्ध..

*🔥रोवस्त्र*
_टि-शर्ट, शर्ट, जिन्स, जाँगर्स आणि हुडीस_
५० टक्के आँफ..💰

*🔥राऊत आणि कंपनी*
_साडी, सुटींग, शर्टींग_
₹ ९९ पासून साड्या उपलब्ध;
२० टक्के पर्यत सुट..💰

🏃🏻‍♂️चला तर वेळ का घालवता? आज भेट द्या! आणि लाभ घ्या! दिवाळीच्या धमाका ऑफर्स चा..🏃🏻‍♀️

*🔮 आमचा पत्ता 🤷🏻‍♂️*
*_🏬 भाट बिल्डींग, सावंतवाडी_*
*_📱संपर्क : 9156992364_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!