उद्या कुडाळ मध्ये सिंधुदुर्ग भाजपाची महावितरणला धडक बेधडक..
▪️अवाजवी वीजबिले वसुलीची महावितरणची मनमानी चालू देणार नाही; भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा इशारा.
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर
🎴कुडाळ,दि.१८: महावितरणतर्फे अवाजवी वीजबिलांची आकारणी केली जात असून त्यांची अन्यायकारक वसुली करण्याचा घाट घातला जात आहे. शासनाच्या आणि मंत्र्यांच्या बुरख्याआड लपून जनतेवर दबाव टाकला जात आहे. यापूर्वी भारतीय जनता पक्षाने सर्वसामान्य जनतेच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून ही लूटमार वेळीच थांबवण्याचा इशारा दिला होता. मात्र थोडा काळ जाताच महावितरणने पुन्हा डोके वर काढत जनतेला नोटीसा काढत विजबिले भरण्यासाठी धमकवायला सुरवात केल्याचे निदर्शनास येत आहे. महावितरण भलेही ऊर्जामंत्र्यांचे आदेश घेऊन त्यासाठी मनमानी करत असेल, पण भाजपा ही त्यांची दडपशाही चालू देणार नाही. जनतेची निर्दयीपणे प्रचंड आर्थिक लुटमार होत असून त्याविरोधात सिंधुदुर्ग भाजपा उद्या रस्त्यावर उतरत महावितरणला जाब विचारणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष श्री राजन तेली यांनी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सामान्य जनता व व्यापारी-उद्योजकांचे कंबरडे आधीच मोडले आहे. त्यातच भरमसाठ वीजबिलांमुळे या सर्वच वर्गाचे जगणे मुश्किल झाले आहे. योग्य बिल आणि ते भरण्यास सवलत मिळालीच पाहिजे ही भाजपाची मागणी आहे. बिलापायी जिल्ह्यातील कोणाचीही वीज कापण्यात येऊ नये ही भाजपाच्या यापूर्वीच्या आंदोलनातली प्रमुख मागणी राहिली होती. महावितरणने उर्जामंत्र्यांच्या नावाखाली जिल्ह्यातील जनतेला विजबिले भरण्यासाठी सक्ती करण्याचे राबवलेले नवे धोरण या जिल्ह्यात अजिबात चालू देणार नाही. उद्या होणाऱ्या महावितरण विरोधातील बेधडक आंदोलनात या मनमानीविरोधात आवाज उठवून भाजपा ठामपणे जनतेच्या पाठीशी राहणार आहे, सर्वसामान्य जनतेने घाबरून जाऊ नये, आपल्या न्याय्य हक्कासाठी उद्या सकाळी ११ वाजता कुडाळमधील आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष श्री राजन तेली यांनी केले आहे.
*_🎊 चला दिवाळी करु साजरी.. नवीन सायकल आणू दारी! 🚲_*
*_🚴♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴♂️_*
*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*
🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स
*_🌈दिवाळी साठी सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚
*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com
*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*
*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

