माझी शाळा माझी जबाबदारी हे धोरण पालकांनी राबवले तरच मराठी शाळा टीकतील-प्राचार्य रणजीत मराठे
माझी शाळा माझी जबाबदारी हे धोरण पालकांनी राबवले तरच मराठी शाळा टीकतील-प्राचार्य रणजीत मराठे
सावंतवाडी प्रतिनिधी
इंग्रजी माध्यमांचे वाढते फ्याड पाहता आता मराठी प्राथमिक शाळा मधील लगबग आणि विद्यार्थ्यांची असलेली गर्दी आणि ह्याच मराठी शाळेतून शिकून अनेक विद्यार्थी उच्चस्पदापर्यंत यशस्वी जी हे वन जगत आहेत आणि खऱ्या अर्थाने यशाची शिखर गाठण्यास यास मराठी शाळा कारणीभूत आहेत मात्र त्याच गावागावातील मराठी शाळा मधील विद्यार्थ्यांची संख्या रोडावत चालली आहे ते पाहता आता गावातील त्या पूर्वीच्या प्राथमिक माध्यमिक मराठी शाळा टिकवायच्या असतील तर माजी विद्यार्थी व गावातील लोकांनी माझी शाळा माझी जबाबदारी अशी भूमिका घेऊन गावातील मराठी माध्यमांच्या शाळा टिकवायला हव्यात असे मत देवरुख डी कॅड आर्ट कॉलेजचे प्राचार्य रणजीत मराठे व शिक्षण प्रेमी कॅप्टन दीपक परब या दोन्हीही कुण के रीतील माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या विद्यार्थी गुणगौरव व बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमात माझी शाळा माझी जबाबदारीचा नारा दिला आहे.
कुणकेरी येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक एक च्या वार्षिक विद्यार्थी गुणगौरव व बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रम झाला या कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून श्री मराठे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी व्यासपीठावर शाळेचे माजी विद्यार्थी आणि कॅप्टन दीपक परब प्रमुख पाहुणे म्हणून कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष तथा जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार एडवोकेट संतोष सावंत मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष भरत गावडे ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष गोवेकर सरपंच सोनिया सावंत शिक्षणतज्ञ सूर्यकांत सावंत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजन म डवळ मुख्याध्यापक कवी विठ्ठल कदम केंद्रप्रमुख म ल देसाई माजी सैनिक कैलास परब सैनिक पांडुरंग परब सुनील परब जितेश कुणकेरकर अंकिता जोशी अनुराधा गावडे नागेश गावडे श्री परब आधी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी या शाळेत दरवर्षी विविध उपक्रम राबवण्यात येतात तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टीने जे जे उपक्रम राबविण्यात येतात तसेच अनोखे उपक्रम घेण्यात येतात त्या सर्वांमध्ये वृक्षमित्र निबंध मित्र ग्रंथ मित्र तसेच आदर्श विद्यार्थी अशा विविध भावविश्व स्पर्धेतील विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले
यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे तालुकाध्यक्ष श्री सावंत म्हणाले कुण केरी प्राथमिक शाळा मध्ये ज्या पद्धतीने विविध उपक्रम राबवले जातात ते कौतुकास्पद आहे आजी आजोबा संमेलन पहिले घेण्यात आले त्याची मुहूर्तमेढ आता संपूर्ण राज्यातील शाळांमध्ये होणार आहे मराठी शाळेत विद्यार्थी खऱ्या अर्थाने घडतो या शाळेतील शिक्षक मुलांना दर्जेदार शिक्षण देत आहेत त्यामुळेच येथील शाळा जिल्हास्तरावर राज्यस्तरावर चमकत आहे यावेळी भरत गावडे सुभाष गोवेकर मल देसाई सरपंच श्रीमती सावंत यांनी विद्यार्थ्यांनी पुढील जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कष्ट आणि जिद्द आणि आत्मविश्वासाने कार्यरत राहिला हवे मराठी शाळा टिकवण्याच्या दृष्टीने सर्वांनी आता हातभार लावायला हवा यावेळी शिक्षण तज्ञ सूर्यकांत सावंत म्हणाले या शाळेला पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत आहे ती ग्रामपंचायतने दूर करावी तसेच शौचालय उभारण्यासाठी सर्वांनी जे सहकार्य केले ते खरोखरच कौतुकास्पद आहे यावेळी प्रास्ताविकात मुख्याध्यापक विठ्ठल कदम म्हणाले या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे भावविश्व जोपासण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबवले जातात व त्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो विविध स्पर्धा घेऊन त्यातून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात त्यांना पुढील काळात कसे करिअर करता येईल त्याचे मार्गदर्शन हे केले जात आहे ही शाळा उच्चस्तरीय अधिकारी साहित्यिक तसेच अन्य विविध व्यक्तीने शाळेला भेटी दिले आहेत त्यावेळी त्यांनी ही शाळा म्हणजे स्वप्नातील शाळा असा शेराही दिला आहे या शाळेत आजी आजोबा संमेलन भरवण्यात आले आणि हे संमेलन जेष्ठ नागरिक संघाला भावले त्यामुळे त्यांनी शासनाकडे तशी मागणी केली त्यानुसार आता या शाळेत राबवण्यात आलेले आजी आजोबा संमेलन आता राज्यातील सर्व शाळांमध्ये राबवण्यात येत आहेत त्यामुळे खऱ्या अर्थाने या गावाला ते भूषणाव आहे असे ते म्हणाले यावेळी सूत्रसंचालन शिक्षिका नीता सावंत यांनी केले फोटो सावंतवाडी कुणकेरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर एक मधील विद्यार्थ्यांचा गुणगौरव व वार्षिक बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करताना प्राचार्य रणजीत मराठे बाजूला कॅप्टन दीपक परब एडवोकेट संतोष सावंत सरपंच सोनिया सावंत सुभाष गोवेकर भरत गावडे मल देसाई राजन म डवळ सूर्यकांत सावंत नीता सावंत आधी उपस्थित होते.

