Friday, September 25, 2026
Latest:
कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

ग्राम रोजगार सेवकाच्या जाचक अटी रद्द

ग्राम रोजगार सेवकाच्या जाचक अटी रद्द

वेंगुर्ले

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे काम पाहणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांच्या जाचक अटी रद्द करण्याचा निर्णय रोजगार हमी योजनेचे मंत्री संदीपान भुमरे यांनी घेतला आहे. राज्यातील २८००० ग्राम रोजगार सेवकांनी काम बंद आंदोलन पुकारल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात नुकतीच बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ग्राम रोजगार सेवकांना काम अनेक अडचणी व करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्या संदर्भात संदीपान भुमरे यांच्या नेतृत्वाखाली रो. ह. योजनेचे अव्वल सचिव नंदकुमार वर्मा यांच्या
उपस्थितीत रोजगार हमी योजनेच्या सर्व संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. बैठकीत २० मजुरांपेक्षा जास्त सार्वजनिक कामावरील मोबाईल मांनेटरींग सिस्टिमपासून रोजगार सेवकांची मुक्तता होणार आहे. शिवाय प्रवास भत्ता व स्टेशनरी मिळणार आहे. ग्राम रोजगार सेवकांची पूर्णवेळ कर्मचारी म्हणून नियुक्ती व फिक्स मानधन या दोन मागण्यासंदर्भात येत्या १५ दिवसांत निर्णायक बैठक घेण्यात येणार असल्याचे आश्वासन भुमरे यांनी दिले. या बैठकीला शिवाजी गाडे, दयानंद कांबळे, बाळासाहेब तायडे, राजेंद्र चिचकार, दानेश पठाण, शेख, विलास जोगदांडे, दत्तात्रय सुतार, प्रशांत लोणारे, सोनी शर्मा, सुरेश मापारी, भाकरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!