चोरीप्रकरणी मुन्ना शेख याच्या कोठडीत वाढ
चोरीप्रकरणी मुन्ना शेख याच्या कोठडीत वाढ
सावंतवाडी
घरातून मोबाईल, सोन्याची चेन तसेच लोखंडी डंबेल्स असा ३८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या संशयित साजिद उर्फ मुन्ना इसाक शेख (सध्या बिरोडकर टेंब, रा. सावंतवाडी) याच्या पोलीस कोठडीत एक दिवसाची वाढ झाली आहे. याबाबतची तक्रार सालईवाडा शासकीय विश्रामगृहाजवळ राहणारे अल्ताफ मुल्ला यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ साजिद शेख याला ताब्यात घेऊन अटक केली होती. त्याला ६ फेब्रुवारीला न्यायालयात हजर केले असता आठ फेब्रुवारीपर्यंत दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गणेश कराडकर यांनी आरोपीची घरी जाऊन झाडाझडती घेतली असता त्यांना चोरीतील लपवून ठेवलेली लोखंडी डंबेल्स आढळले. ते पोलिसांनी जप्त केले. चोरीतील ऐवज हस्तगत करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी न्यायालयात केली. त्यानुसार न्यायालयाने तपासासाठी पोलीस कोठडीत एक दिवसाची वाढ केल्याची माहिती तपासी अधिकारी कराडकर यांनी दिली.

