Friday, September 25, 2026
Latest:
कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

‘स्वदेश दर्शन’मध्ये सिंधुदुर्गला समाविष्ट करा

‘स्वदेश दर्शन’मध्ये सिंधुदुर्गला समाविष्ट करा!

कुडाळ

सिंधुदुर्ग जिल्हा ‘स्वदेश दर्शन योजना भाग-२’ `मध्ये सहभागी करून पर्यटनाच्या दृष्टीने नवीन DPR बनवावा आणि स्वदेश दर्शन योजनेची अंमलबजावणी तातडीने करा, अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी निवेदनाद्वारे केंद्रीय पर्यटन मंत्री जी. कृष्णरेड्डी यांच्याकडे केली आहे.
कृष्णरेड्डी यांनीसुद्धा दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन खात्याला लवकरात लवकर DPR केंद्र
सरकारकडे सादर करण्याचे आदेश दिले.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘स्वदेश दर्शन योजना भाग-१’ मध्ये समावेश व्हावा, यासाठी आपण यापूर्वीच विनंती केली होती. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुंदर समुद्र किनारे, ऐतिहासिक वास्तू जलक्रीडा, वनस्पती आणि प्राणी आहेत. वर्षभर देश-विदेशातील लाखो पर्यटक या ठिकाणी भेट देतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!