कोकणक्राइममहाराष्ट्रसिंधुदुर्ग

जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपात निर्दोष मुक्तता

जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपात निर्दोष मुक्तता

ओरोस

देव दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या एका व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपातून आरवली येथील वेतोबा देवस्थानचे अध्यक्ष जयवंत बाबुराव राय यांची विशेष जिल्हा न्यायाधीश एस. जे. भारुका यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. राय यांच्यावतीने अॅड. भरत प्रभू यांनी काम पाहिले. वेंगुर्ले तालुक्यातील आरवली येथील प्रसिद्ध देवस्थान श्री देव वेतोबाचा वर्धापन दिन साहेळा दरवर्षी साजरा केला जातो. ३० एप्रिल २०१७ रोजीच्या वर्धापन दिन सोहळ्यात देव दर्शनासाठी रांगेत उभा असताना राय यांनी आपल्याला धक्का मारून जातीवाचक अपशब्द वापरले, अशी तक्रार एका भक्ताने केली होती. त्यानुसार पोलिसांनी राय यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला होता. न्यायालयातील सुनावणीत न्यायालयाने संशयिताचे सबळ पुराव्याअभावी राय यांची निर्दोष मुक्तता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!