कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

वरवडे परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

वरवडे परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

कणकवली

गेले काही दिवस वरवडे ग्रामपंचायतीच्या वरील डोंगरभागात बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. काहीवेळा लगतच्या घरापर्यंत बिबट्या येऊन गेला आहे. मंगळवारी पहाटे ५.५० वाजण्याच्या सुमारास नळयोजनेचे पाणी सोडण्यासाठी गेलेल्या प्रथमेश घाडीगावकर याच्यावर बिबट्याने हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. परंतु वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
वरवडे ग्रामपंचायतीला लागून जंगली भाग आहे. या वरील भागात बिबट्या, गवारेड्यांचा मुक्त संचार सुरू असतो. अलिकडे या भागात बिबट्या अनेकांना दिसून आला आहे. घाडीगावकर वाडीपर्यंतही हा बिबट्या आल्याचे सांगितले जाते. मंगळवारी सकाळी ५.५० वाजण्याच्या सुमारास प्रथमेश घाडीगावकर हा नळयोजनेचे पाणी सोडण्यासाठी जात असताना जंगल भागात लपून बसलेल्या बिबट्याने बॅटरीचा प्रकाश पडताच त्याच्यावर हल्याचा पर्यन्त केला. मात्र, तो मागे पळाल्याने बिबट्या जंगलात पळून गेला.कोणतीही दुखापत झाली नाही. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!