कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

काकाच्या अंत्यसंस्कारानंतर मुंबईहून आलेल्या पुतण्याचे निधन वरवडे-हिवाळवाडी येथील घटना

काकाच्या अंत्यसंस्कारानंतर मुंबईहून आलेल्या पुतण्याचे निधन

वरवडे-हिवाळवाडी येथील घटना

कणकवली

वरवडे-हिवाळवाडी येथील महेश उर्फ पिंट्या नारायण बांदल (३८) या युवकाचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वरवडेचे माजी सरपंच प्रभाकर बांदल यांचे सोमवारी निधन झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी सख्खा पुतण्या महेश हे मुंबईहून मंगळवारी गावी आले होते. प्रभाकर यांच्या अंत्यसंस्कारानंतर महेश यांना अत्यवस्थ वाटू लागल्या कणकवलीतील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तपासणीअंती त्यांचा मृत्यू झाला होता. अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

वरवडेचे माजी सरपंच प्रभाकर बांदल यांचे सोमवारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांचे सख्खे पुतणे महेश हे आपल्या भावासह मंगळवारी मुंबईहून गावी येणार असल्याने कै. प्रभाकर यांच्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार महेश व भाऊ मंगळवारी आले. पुतणे आल्यानंतर प्रभाकर यांच्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आले. त्यानंतर महेश यांना छातीत दुखून अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन. झाले.

महेश यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुलगे, भाऊ, काकी, चुलतभाऊ असा परिवार आहे. वरवडेचे माजी सरपंच नारायण बांदल यांचे ते सुपुत्र होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!