राजकीय

तब्बल १० वर्षांनी माजगाव ग्रामसभा संपन्न… अनेक विषयावर झाली सकारात्मक चर्चा

 

सावंतवाडी, दि.२७:- माजगांव येथे प्रजासत्ताक दिन २६ जानेवारीला काल ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात पार झाली. तब्बल १०वर्षांनंतर प्रथमच कोरम पूर्ण करुन ग्रामपंचायत मध्ये गावांतील पाणी,लाईट प्रश्न, शेतकऱ्यांच्या विविध मुद्यावर, विविध विकास कामांवर चर्चा करण्यात आली.
सभा सरपंच डॉ. अर्चना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. माजी जि. प. अध्यक्षा रेश्मा सावंत ,उपसरपंच बाळा वेजरे, बाबु सावंत, आनंद सावंत,संजय कानसे, ग्रामसेवक श्री गोसावीयासह कृषी, विभाग कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी १८० ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!