देवगड येथे २६ रोजी शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धा
देवगड येथे २६ रोजी शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धा
हनुमान युवक क्रीडा मंडळाचे आयोजन
देवगड
येथील हनुमान युवक क्रीडा मंडळाच्या ४३ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्रजासत्ताक दिनानिमित्त २२ व २६ जानेवारी रोजी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
२२ रोजी सकाळी ७ वा. फास्ट सायकल स्पर्धा घेण्यात येणार आहे. खुल्या गटासाठी दाभोळ तिठा ते मांजरेकर नाका या अंतरावर, तर शालेय गटासाठी खाकशी तिठा ते मांजरेकर नाका या अंतरावर ही स्पर्धा होणार आहे. खुल्या गटातील प्रथम, द्वितीय क्रमांकांना अनुक्रमे १ हजार रूपये, ७०० रूपये व चषक तसेच दोन उत्तेजनार्थ क्रमांकांना प्रत्येकी ३०० रूपयांचे बक्षीस देण्यात येईल. तर शालेय गटातील प्रथम, द्वितीयक्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे ७०० रूपये, ५०० रूपये व चषक देण्यांत येईल. तसेच दोन उत्तेजनार्थ क्रमांकांना प्रत्येकी २०० रूपयांचे बक्षीस देण्यात येईल. त्यानंतर सकाळी ९ वा. वैयक्तिक क्रीडा स्पर्धा होणार आहेत. यात पुरुष गटात १००, २००, ४०० मी. धावणे, लांबउडी, उंचउडी व गोळाफेक स्पर्धा होणार आहे. तर महिला गटासाठी १००, २००, ४०० मीटर धावणे, लांबउडी व गोळाफेक स्पर्धा होणार आहे. २६ रोजी सकाळी १० वा. शेठ म. ग. हायस्कूल येथे देवगड तालुका मर्यादित शूटिंग व्हॉ लीबॉल स्पर्धा होणार आहे. यातील प्रथम, द्वितीय क्रमांकाला अनुक्रमे ५ हजार रूपये, ३ हजार रूपये व चषक देण्यात येईल. तसेच दोन उत्तेजनार्थ क्रमांकांना प्रत्येकी एक हजार रूपयांचे बक्षीस देण्यात येईल.

