महाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

सावंतवाडी संस्थान मराठा समाज स्नेहसंमेलन २२ रोजी

सावंतवाडी संस्थान मराठा समाज स्नेहसंमेलन २२ रोजी

कुडाळ

सावंतवाडी संस्थान मराठा समाज (मुंबई) संस्थेचे २८ वे सिंधुदुर्ग जिल्हा स्नेहसंमेलन व विद्यार्थी गुणगौरव समारंभ २२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता येथील पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज सभागृह येथे होणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष इंद्रजीत सावंत आहेत. तसेच प्रमुख प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी गटविकास अधिकारी बासुदेव नाईक उपस्थित राहणार आहेत, तर प्रमुख वक्ते जिल्हा उद्योग केंद्राचे सेवानिवृत्त व्यवस्थापक परशुराम गावडे मार्गदर्शन करणार आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे कार्यकारी विश्वस्त सतीश सावंत व कार्याध्यक्ष शशिकांत गावडे यांनी केले आहे.

विठ्ठल भा. नाईक यांचा ७५ वर्षपूर्तीनिमित्त सत्कार होणार आहे. तसेच मराठा समाज गौरव पुरस्काराने सामाजिक व ज्येष्ठ संस्था कार्यकर्ते चंद्रकांत कदम, सामाजिक व शैक्षणिक कार्यकर्ते भरत गावडे, सामाजिक व शैक्षणिक कार्यकर्त्या विशाखा पालव, प्रगतशील शेतकरी नारायण गावडे, सामाजिक कार्यकर्ते संजय घोगळे, शैक्षणिक कार्यकर्ते विवेकानंद बालम व रघुनाथ घोगळे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. राजमाता जिजाऊ पुरस्कार शैक्षणिक कार्यकर्त्या स्नेहलता घोगळे यांना दिला जाणार आहे.

तसेच बालवाडी स्नेहसंमेलन २१ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजता होणार आहे. यानिमित्त सत्यनारायण महापूजा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!