वडिलांपाठोपाठ मुलाचेही निधन
वडिलांपाठोपाठ मुलाचेही निधन
ओटवणे
अवघ्या चार दिवसात वडिलां पाठोपाठ मुलाचेही निधन झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी सांगेली- खालचीवाडी येथे घडली. एकाच कुटुंबात पाठोपाठ घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे राणे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगरच कोसळला.
सांगेली येथील पुनाजी कृष्णा राणे (७५) यांचे सोमवारी १६जानेवारीला अल्प आजाराने निधन झाले. या दुःखातून राणे कुटुंबीय सावरत असतानाच त्यांचा मुलगा बाळकृष्ण पुनाजी राणे (३६) याचे गुरुवारी सकाळी निधन झाले. एकाच घरातील दोघांच्या निधनाने राणे कुटुंबियांवर आभाळच कोसळले.
यावेळी सांगेली सरपंच लवू भिंगारे व त्यांचे | सहकारी, पोलीस पाटील विठ्ठल डोईफोडे आदींनी धाव घेत कुटुंबाचे सांत्वन केले. गुरुवारी सायंकाळी बाळकृष्णवरअंत्यसंस्कार करण्यात आले.
