सिंधुदुर्ग जिल्हा मजूर संघासाठी २६ उमेदवार रिंगणात
सिंधुदुर्ग जिल्हा मजूर संघासाठी २६ उमेदवार रिंगणात
सिंधुदुर्गनगरी
सिंधुदुर्ग जिल्हा मजूर सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची अंतिम यादी निवडणूक निर्णय अधिकारी यू यू यादव यांनी जाहीर केली आहे. संचालक मंडळाच्या एकूण १३ जागांसाठी २६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे एकास एक अशी लढत होणार असून महाविकास आघाडी पुरस्कृत समृद्धी सहकार पॅनल आणि भाजप पुरस्कृत श्रमसहकार पॅनेल अशी दुरंगी लढत होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा मजूर सहकारी संस्थांचा संघ या संघाच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक १ फेब्रुवारी रोजी होत असून
या निवडणुकीसाठी एकूण ४३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. १३ जागांसाठी ही निवडणूक होत असून २६ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने एकास एक अशी लढत होणार आहे. १ फेब्रुवारी रोजी $ सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
जिल्हा माध्यमिक अध्यापक पतपेढी सभागृहामध्ये एकमेव मतदान केंद्र निश्चित करण्यात आले असून १२७ सभासद त्यासाठी मतदान करणार आहेत. सायंकाळी ४ वाजता मतदान संपल्यानंतर त्याच ठिकाणी त्याच
दिवशी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
एकूण १३ उमेदवारांमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातून लक्ष्मण आंगणे, अनिल गोपाळ गडकर, संभाजी गजानन साटम, संतोष मनोहर परब, श्रीकांत चंद्रकांत न राणे, चंद्रकांत सकाराम राणे, आत्माराम बळीराम बालम,, राजेंद्र कृष्णा सावंत. महिला प्रतिनिधी म्हणून दीपिका दीपक सावंत, शीतल विश्वास म्हसकर, इतर मागासमधून पुरुषोत्तम भास्कर खेडेकर, अनुसुचित जाती जमातीमधून दत्ताराम राजाराम खेडेकर, विमुक्त जाती भटक्या जमातीमधून जयेश
विजय धुमाळे हे १३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
भाजप पुरस्कृत श्रमसहकार पॅनेल निवडणूक लढवत असून पॅनेल प्रमुख गजानन सुमंत गावडे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविली जात आहे. या पॅनेलमध्ये गजानन सुमंत गावडे, सुनील रामचंद्र भोगले, विठ्ठल दत्ताराम देसाई, संदीप रमाकांत सावंत, आनंद विठ्ठल पारकर, आशुतोष रमेश सावंत, राजेंद्र नारायण प्रभूदेसाई, शिवराम विठ्ठल परब हे सर्वसाधारण प्रवर्गातून निवडणूक लढवत आहेत. महिला प्रतिनिधी म्हणून प्रणाली आनंद मसुरकर, मेघा गोपाळ जीकमडे तसेच समीर सहदेव ठाकुर, रामचंद्र जनार्दन जंगले, अनिल विनायक कोरगावकर है १३ उमेदवार रिंगणात आहेत.
