दारू धंद्यातील युवकांची नवीन थीम ‘आयटमला पुढे बसवा, बिनधास्त दारू ओढा’..
▪️सावंतवाडी तालुक्यातील अनेक गावांमध्ये दारू विक्रेत्यांचे थैमान..
▪️काही गावातील हॉटेल मध्ये परमिट रूम सारखी केली जाते दारू विक्री..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सावंतवाडी
🎴सावंतवाडी,दि.१६: कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल ने गोव्यात्तून सिंधुदुर्गात व महाराष्ट्राच्या इतरत्र जिल्ह्यात होणाऱ्या दारु तस्करी बद्दल आवाज उठविल्यानंतर दारू बद्दल उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना व पोलिसांना जागे होऊन कारवाई करणे भाग पडले. पोलिसांची सततची होणाऱ्या कारवाई मुळे दारूधंदे वाल्यांनी नवीन थीम तयार केली आहे. ‘आपल्या आयटमला पुढे बसवा, बिंदास्त दारु ओढा’ अशा या थीमचे नाव आहे.
एखाद्या महागड्या चार चाकी गाडी मध्ये सुंदर युवती पुढे बसवायची, तीच्या एक दोन मैत्रिणी मागे बसवल्या की, मग पोलिसही त्या गाडीची तपासणी करणार नाहीत, अशी नवी शक्कल लढवून आता दारू धंद्यात उतरलेले हे नवीन युवक आपल्या आयटमला चार चाकी गाडी मध्ये पुढे बसून मागे दारूचे बॉक्स भरून बिंंदास्त गाड्या घेऊन जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
पोलिसही एखाद्या गाडीत समोर युवती दिसली की, ती गाडी तपासणी करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. याचा फायदा दारू तस्करांनी उठवला आहे. तस्करांनी आपल्या अल्पवयीन युवकांना व त्यांच्या आयटमला घेऊन गोव्यात जाण्याचे फर्मान काढून येताना दारूने भरलेले बॉक्स घेऊन यायचे, जातात बरोबर मैत्रिणीही असतात, त्यांना एखाद-दुसरे बीच फिरवले जाते, नंतर मनोसोक्त जेवण करून दारू भरून गाडी घेऊन येतात. या नव्या युक्तीमुळे या युवकांचे भलतेच फावले आहे.
पोलिसांनी आता अशा संशयित गाडयांची तपासणी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तपासणी नाक्यावरून अशा गाड्या सोडून न देता त्यांची झडती घ्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत.
सावंतवाडी शहरातील तर युवक शिल्पग्राम परिसरात महागड्या किमतीच्या दुचाकी गाड्या घेऊन पाठीमागे आपल्या आयटमला बसून गाड्यांची रेस लावून सिनेमाचे ट्रेलर रोज सायंकाळी सहा नंतर सुरू असते. त्यामुळे या युवकांची दहशत परिसरात निर्माण झाली आहे. पादचारी आपला जीव मुठीत घेऊन त्या ठिकाणाहून जातांना दिसतात. आणि यातील बरेच युवक राजकीय पक्षाशी संबंधित असल्यामुळे पोलिसही त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे.
सावंतवाडी तालुक्यातील आंबेगाव पेडवे, माडखोल, देवसू, दाणोली, आंबोली, कोलगाव, चराठे, विलावडे, माजगाव आदी गावात मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू विकली जात आहे. आंबेगाव मध्ये तर पोलिसांनी दोन-तीन वेळा छापे टाकून आंदोलने करूनही दारू विक्री अद्याप सुरू आहे. पोलिसांनी अशा गावात गस्त घालून अचानक धाडी टाकून संबंधितांचे धंदे बंद करावेत अशी मागणी प्रत्येक गावातून केली जात आहे.
काही गावांमध्ये तर हॉटेल मध्ये परमीट बार सारखी दारू विक्री केली जाते. गिर्हाईकांना दुकानात बसून दारू पिण्यासाठी दिली जाते. अशा गावातील धंद्य्याची पोलीसांनी पोलीस पाटील मार्फत माहिती घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी अनेक गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

