🟥 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसेचे पक्ष निरीक्षक सिंधुदुर्गात
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-१०:-* महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सावंतवाडी विधानसभा आणि कुडाळ विधानसभा तसेच कणकवली विधानसभा तिन्ही विधानसभा बैठका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्ष निरीक्षक श्री संदीप दळवी सरचिटणीस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, श्री गजानन राणे सरचिटणीस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, श्री प्रवीण मर्गज उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना, श्री योगेश सावंत उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाल्या .यावेळी पक्ष निरीक्षकांनी सर्व पदाधिकारी माजी व महाराष्ट्र सैनिक यांना मार्गदर्शन केले. आगामी काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना गाव तिथे शाखा या उद्देशाने प्रत्येकाला काम करायचं आहे. आणि प्रत्येकाने एक ऊर्जा घेऊन पक्षाच्या वाढीसाठी गावागावात शाखा गाव तिथे झेंडा या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे. त्याचप्रमाणे पक्षाकडून याबाबतीत सर्व आर्थिक सहाय्य केले जाईल, आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठ्या ताकतीने उतरणार आहे. या सर्व गोष्टी करता मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्या मध्ये तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे गावागावात प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखेचा बोर्ड आणि झेंडा हा लावला पाहिजे .महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष राज साहेबांच्या विचारांवर चालतो राज साहेबांच्या जाहीर सभा या सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाने काम करायचं आहे असं मार्गदर्शन ही त्यांनी केले यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या भावना पक्ष निरीक्षक यांच्यापर्यंत पोहोचवल्या या तिन्ही विधानसभाचा आढावा माननीय राज साहेब ठाकरे यांना सुपूर्द केला जाईल. व प्रत्येक गावी पक्ष संघटना बांधण्याकरता आपण सर्व पक्ष निरीक्षक मुंबई स्थित पदाधिकारी गावोगावी फिरणार आहोत, तसेच ग्रामपंचायत निवडणूक मध्ये निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्यांचा या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी आपले मनोगत व्यक्त केले. माजी उपजिल्हाध्यक्ष एडवोकेट अनिल केसरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच प्रत्येक तालुकाध्यक्ष यांच्याशीही चर्चा करण्यात आली .पक्ष वाढीसाठी ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्या त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. असे आश्वासन पक्ष निरीक्षक यांनी दिले यावेळी तिन्ही विधानसभा मतदारसंघात मोठ्या संख्येने पदाधिकारी यांनी ऊर्जा निर्माण करून आपण गावागावात पक्ष शाखा उभारू आणि पुन्हा मनसे या जिल्ह्यात नंबर वन पक्ष करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहो अशी आश्वासन पक्षनिरीक्षक यांना दिले. यावेळी माजी संपर्क अध्यक्ष श्री हेमंत जाधव, माजी जिल्हाध्यक्ष धीरज परब माजी उपजिल्हाध्यक्ष दत्ताराम गावकर, दयानंद मेस्त्री, एडवोकेट अनिल केसरकर, जिल्हा सचिव माजी बाळा पावस्कर, माजी तालुकाध्यक्ष गणेश वाईरकर, विनोद सांडव, गुरुदास गवंडे, दत्ताराम बिडवाडकर, प्रसाद गावडे, सचिन सावंत, सुनील गवस, चंदन मेस्त्री, एडवोकेट राजू कासकर, कुणाल किनळेकर,भारती वाघ, चिन्मय नाडकर्णी, श्रेया देसाई, श्रीराम सावंत, लॉटरी सेनेचे अमित गाडी ,रुपेश पांगम, जयद्रथ गावडे, पॉस्कोल्ड रोड्रिक्स, दीपक गावडे, अनंत आचरेकर, जगन्नाथ गावडे, सुशांत परब, मिलिंद सावंत सुनील आसवेकर, आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*🗓️नवीन वर्षाच्या..नवीन कॅलेंडर छपाई साठी 📆एकमेव दालन *प्रसाद ऑफसेट*_
_📆🗓️स्वस्त, सुबक आकर्षक सहपानी डेट कॅलेंडर फक्त १७ ते १८ रुपयात_( आपल्या फर्मच्या नावासह)
साईझ -10″×15″किमान ऑर्डर 200
*टेबल कॅलेंडर*
*आर्ट कॅलेंडर*
*पॉली कॅलेंडर*
*पॉकेट कॅलेंडर*
_विविध साईझ मध्ये डेट डायऱ्या आपल्या फर्मच्या नावानीशी अर्जंट छापाईकरून मिळतील._
*🏷️खास एलआयसी विमा प्रतिनिधीसाठी विशेष डिझाईन केलेले डेट कॅलेंडर उपलब्ध*
*🪩LIC साठी खास एजंटांसाठी २०२३ साठी आकर्षक भेटवस्तू*
तारीख कॅलेंडर(L.I.C. नवीन योजनांसह)
*टेबल कॅलेंडर*
*पॉली कॅलेंडर*
*डेट डायरी*
*पॉकेट डायरी*
विविध प्रकारच्या फाइल्स आणि फोल्डर्स,सेव्हिंग बॉक्स, इतर आकर्षक भेटवस्तू
*टीप:-मराठी दिनदर्शिका देखील उपलब्ध आहेत*
*🔸प्रसाद ऑफसेट*
_लेक व्यू बिल्डिंग, चितारआळी सावंतवाडी, सिंधुदुर्ग,महाराष्ट्र_
*🎴मोबाईल क्र.* 9822856111, 9422065195, 7057956111
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

