कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

नवोदय विद्यालयात सहावी प्रवेश प्रक्रिया

नवोदय विद्यालयात सहावी प्रवेश प्रक्रिया

सावंतवाडी

शिक्षा मंत्रालय भारत सरकार द्वारा संचलित सांगेली येथील नवोदय विद्यालयात २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षासाठी सहावीत प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या वर्षी प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सूचना नवोदय विद्यालय समिती, नोएडाद्वारा प्राप्त झाली असून सदरच्या प्रवेशाची सर्व माहिती https://navodaya. gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

प्रवेश अर्ज निःशुल्क ऑनलाईन भरण्यासाठी पालकांची व विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पालकांनी प्रथम नवोदय विद्यालय समितीच्या वेबसाईटवरील प्रमाणपत्र डाऊनलोड करून घेऊन इंटरनेटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा. हा अर्ज भरत असताना मुख्याध्यापकांची सही, पालकांची सही, विद्यार्थ्याची सही व फोटो आवश्यक आहे.

सहावीसाठी निवड चाचणी प्रवेश परीक्षेस बसणारा विद्यार्थी सलग तिसरी

व चौथी पास असावा. पाचवीमध्ये संपूर्ण वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिकणारा असावा. त्याचा जन्म ०१.०५.२०११ ते ३०.०४.२०१३ (दोन्ही दिवस पकडून) पर्यंतचा असावा. त्याने १५.०९.२०२२ पूर्वी पाचवीत प्रवेश घेतलेला असावा. त्याचे पालक सिंधुदुर्गचे रहिवासी असावेत. अन्यथा ते प्रवेश अर्ज भरण्यास अपात्र असतील.

ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२३ पर्यंत असून त्यापूर्वी पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज भरावेत. सदर परीक्षा २९ एप्रिल २०२३ रोजी होत आहे. इतर मागास (OBC) प्रवर्गात अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांनी मार्च २०२३ पूर्वी भारत सरकारचे इतर मागास प्रवर्गाचे (OBC- From No.09) जात प्रामाणपत्र काढणे आवश्यक आहे.

प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी परीक्षा प्रमुख जे. बी. पाटील (९४२०२९४५८४) व एस पी. हिरेमठ (९४२१३४०३१२) व प्रतीक कोडुलकर (८१८००७४३४७ यांच्याशी संपर्क करावा, असे प्राचार्य एम. के. जगदीश कळवितात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!