कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडीत रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

“सावंतवाडीत रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद”

*सावंतवाडी- प्रतींनिधी*

‘ॲडमिशन’, ‘व्हॅरेनियम क्लाउड’ आणि ‘सिक्योर क्रेडेंशियल्स’ या कंपन्यांच्या माध्यमातून संयुक्तरित्या रोजगार मेळाव्याचे आयोजन सावंतवाडीत करण्यात आले आहे.700 हुन अधिक कॅन्डीडेट ना या मेळाव्याच्या माध्यमातून विविध ठिकाणी नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत.हा मेळावा जिमखाना मैदान सावंतवाडी येथे होत असून या मेळाव्याला तरून तरुणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण पिढीला रोजगार देण्यासाठी ‘ॲडमिशन’, ‘व्हॅरेनियम क्लाउड’ आणि ‘सिक्योर क्रेडेंशियल्स’ या कंपन्यांनी संयुक्तरित्या आज गुरुवार दिनांक ५ जानेवारी २०२३ रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.हा रोजगार मेळावा सावंतवाडीतील जिमखाना मैदान येथे सुरु झाला असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे.या रोजगार मेळाव्यात ‘आजच मुलाखत; आजच निवड’ या संकल्पनेनुसार एकाच दिवसात तब्बल ७०० हून अधिक जणांना नोकरीची संधी मिळेल. तसेच यावेळी त्वरित जॉइनिंग लेटरही देण्यात येईल.
या रोजगार मिळाव्यात एअरटेल, अमित इलेक्ट्रिक वर्क्स, ऑटो क्राफ्ट, भगीरथ इंटरप्राइजेस, दीप प्लम्बिंग वर्क, युरेका फोर्ब्स, होम रिवाईज एज्युकेशन, हॉटेल नीलम कंट्रीसाईड, हॉटेल स्पाइस कोकण, हॉटेल अप्पर डेक, इनफ्रीपी आयटी सर्व्हिसेस, जैतापकर ऑटोमोबाईल, मार्कसन फार्मा, माया एचआर सोल्युशन, नेक्स्ट स्टॉप टेक्नोलॉजी, वन रिअलअर सिव्हिल, पेटीएम, क्वेस कॉर्पोरेशन, साई प्लम्बिंग वर्क, साई ट्रेडर्स, सिक्योर क्रेडेंशियल्स, टेरमेरिक लाईफ स्टाइल, व्हॅरेनियम क्लाउड, उन्मेष फॅब्रिकेशन, वृषाली ऑटो केअर या पुणे, गोवा, कोल्हापूर येथील प्रमुख कंपन्या तसेच स्थानिक कंपन्या सामील झाल्या आहेत.
या मेळाव्यात बॅक ऑफिस, सॉफ्टवेअर डेव्हलपर, मेकॅनिक्स, डाटा ऑपरेटर, सेल्स एक्सिक्युटीव्ह, आयटी, एज्युकेशन, टेक्निशियन, हॉटेल सर्व्हिसेस या क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.
सध्या जिमखान मैदान येथे युवक युवतीन्नी मोठी गर्दी केली असून
अधिकाधिक युवक-युवतींनी या रोजगार मेळाव्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!