माणगाव नवनिर्वाचित ग्रामपंचायत टीमची सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सकट शिवसेना पदाधिकारी यांची माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट
आरोग्य प्रशासनाला जागमाणगाव सरपंच उपसरपंच ऍक्शन मोड मध्ये*
*माणगाव PHC त औषधेच नसल्याचा योगेश धुरी यांचा दावा तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी केला मान्य*
काल माणगाव PHC ला दिलेल्या भेटिमुळे आरोग्य प्रशासन खडबडून जाग झालं आज तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ श्री कांबळे यांची माणगांव PHC ला भेट दिली
दरम्यान आरोग्यकेंद्रात औषधे उपलब्ध नसल्याचा दावा युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी केला यावेळी औषधांचा आढावा घेतला त्यावेळी तब्बल १८ प्रकारच्या गोळ्या,७ प्रकारचे सिरप,आय व्ही ८ प्रकारचे,इंजेवशन २४ प्रकारचे नाहीत एवढंच नव्हे साधं बँडेज पण माणगांव प्राथमिक केंद्रात उपलब्ध नाही यासंदर्भात योगेश धुरी यांनी नाराजी व्यक्त केली.
सरपंच सौ मनीषा भोसले यांनी लवकरात लवकर प्रश्न सोडवा अशी सूचना केली.उपसरपंच बापू बागवे यांनी डिलिव्हरी रूमची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना केली
यावेळी सरपंच,उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य,युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी,माजी सरपंच बच्चू नाईक,माजी सरपंच बाळा जोशी,एकनाथ धुरी,संजय धुरीकिरण मुंज आदी उपस्थित होते.
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी औषध पुरवठा लवकरात लवकर करू तसेच यापुढे बाहेरची औषधे न लिहून देण्याचे आश्वासन दिले.

