नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडून महोत्सव कार्यक्रमस्थळी पाहणी
कणकवली पर्यटन महोत्सव तयारी अंतिम टप्प्यात
कणकवली (प्रथमेश जाधव) :
कणकवली पर्यटन महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, महोत्सवाच्या आदल्या दिवशी आज नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी महोत्सवस्थळी भेट देत नियोजनाचा आढावा घेतला. कणकवली नगरपंचायत च्या वतीने नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेला पर्यटन महोत्सव उद्या 5 ते 8 जानेवारी पर्यंत चार दिवस चालणार आहे. या पर्यटन महोत्सवाला सिनेक्षेत्रातील मोठ दिग्गज कलाकार व राज्यभरातील भाजपाचे नेते देखील उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवाच्या निमित्ताने उपजिल्हा रुग्णालयासमोरील पटांगणात भव्य व्यासपीठ उभारण्यात आले असून, व्यासपीठाच्या ठिकाणी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आज भेट देत आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, गटनेते संजय कामतेकर, राजा पाटकर यांच्यासह अन्य उपस्थित होते.

