आणखीमहाराष्ट्रराजकीय

धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात ; छातीला मार

 

*🟥 पुढील उपचारासाठी मुंबईला हलवणार..*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴परळी, दि-०४:-* बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. काल रात्री परळीत ही घटना घडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या अपघातात धनंजय मुंडे यांच्या छातीला मार लागला आहे. सध्या त्यांची प्रकृती ठीक असली तरीही त्यांना मुंबईत पुढील उपचारासाठी पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

अपघाताबद्दल अधिक माहिती अशी की, काल परळीतील आझाद चौकात रात्रीच्या वेळी ही घटना घडली. रात्री सुमारे पावणे तीन वाजेच्या सुमारास धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात झाला. यावेळी धनंजय मुंडे स्वतः गाडी चालवत होते.अपघात नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. धनंजय मुंडे यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरु केले. मात्र त्यांच्या छातीला मार लागली आहे. त्यामुळे पुढील उपचारांसाठी त्यांना मुंबईला हलवण्यात येणार आहे.

धनंजय मुंडे यांना परळीतून लातूर येथे नेलं जाईल.

 

त्यानंतर विशेष विमानाने त्यांना मुंबईत पुढील उपचारांसाठी हलवलं जाईल, अशी माहिती खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे.

धनंजय मुंडे यांच्या गाडीला रात्री तीन वाजेच्या सुमारास अपघात झाला, मात्र याची माहिती आज सकाळपर्यंत फारशी कुणाला नव्हती. आज सकाळी अपघाताची बातमी शहरभर पसरली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.

धनंजय मुंडे लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

मराठवाड्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रिय अन् तरुण नेते म्हणून धनंजय मुंडे यांची ओळख आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचे ते पुतणे आहेत. तर सध्या भाजपातील नेत्या पंकजा मुंडे यांचे ते चुलत भाऊ आहेत.

 

 

*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

____________________________

*_🍫आपल्या सिंधुदुर्गात पहिलीच “चॉकलेट फॅक्टरी”… आणि तेही 🥳आपल्या सावंतवाडी तालुक्यातील मळगाव मध्ये…!🍬_*

 

*🍡श्री गणेश चोकोबाईटस्🍬*

_(चॉकलेट फॅक्टरी)_

 

*♦️उपलब्ध उत्पादने:-*

मिक्स ड्रायफ्रुट्स प्लेन चॉकलेट

ड्रायफुट कोटिंग चॉकलेट

कस्टमाईज चॉकलेट

फिलिंग चॉकलेट

 

*💥खास आकर्षक उत्पादने उपलब्ध:-*

🔸फेस्टिव्हल कलेक्शन

🔸किड्स कलेक्शन

🔸स्पेशल चॉकलेट बुके

 

*💥केक आणि पेस्ट्रीस उपलब्ध:-*

▫️आईसकेक

▫️पेस्ट्रीसकेक

▫️जार केक

▫️रोल केक

▫️फ्लेवर्ड केक

▫️चॉकलेट केक

 

*🍰🎂ऑर्डर प्रमाणे केक बनवून मिळतील….!🧁*

 

*🛑काजू,बदाम,खजूर कोकम, लेमन, मॅगो सरबतसह “कोकणी मेवा” उपलब्ध*

 

*🧃श्री गणेश सॉफ्ट ड्रिंक ड्रायफूट आणि आईस्क्रिम हाऊस…!🍨*

 

*🫖विन तंदूर चहा☕*

डिफरंट टेस्ट युनिक टेस्ट !

 

*🤩आमच्या फॅक्टरीला आवश्य भेट द्या…!🥳आणि चाखा आमच्या अनोख्या चॉकलेटची चव..!!🤠*

 

 

*🎴संपर्क व पत्ता :-*

*श्री गणेश चोकोबाईट्स चॉकलेट फॅक्टरी*

_प्रोप्रा.ज्योती सुरज कोरगांवकर_

_पत्ता : कुंभार्ली – मळगाव, सोनुर्ली तिठा, मुंबई-गोवा हायवे, सावंतवाडी-सिंधुदुर्ग_

 

9920057769

9422054871

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!