कोकणसावंतवाडी

भाजपच्या वतीने विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांचा निषेध

सावंतवाडी तालुका भाजपाच्यावतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार व जितेंद्र आव्हाड यांचा प्रांत कार्यालयासमोर निषेध करण्यात आला. यावेळी अजित पवार व जितेंद्र आव्हाड यांचा निषेध नोंदवत छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते असे केलेले अपमानास्पद वक्तव्य मागे घेऊन त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली.यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर,शहराध्यक्ष अजय गोंदावळे,मनोज नाईक,जिल्हा बँक संचालक महेश सारंग,राजू बेग मोहिनी मडगावकर, उत्कर्षा सासोलकर समृद्धी विरनोडकर उदय नाईक, सुधिर आडीवरेकर, आनंद नेवगी, बंटी पुरोहित, दिपाली भालेकर, मिसबा शेख, केतन आजगावकर, प्रमोद गावडे, दिलीप भालेकर, संजू शिरोडकर,चंद्रकांत जाधव,विराग मडकईकर, संतोष गोसावी, पंढरीनाथ राऊळ, सिदेश कांबळी, परिक्षेत मांजरेकर,अनिल सावंत, गुरुनाथ पेडणेकर, पिंटा सावंत, सुवर्णा गावडे, प्राजक्ता केळुसकर, साक्षी परब, सलमा शेख, मेघना साळगावकर,आरती माळकर, सूक्ष्मवी राऊळ, आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!