कोकणसिंधुदुर्ग

भास्कर जाधव हा वाळू चोर;त्याची राणे साहेबांवर बोलण्याची कुवत नाही

 

 

संजू परब यांची भास्कर जाधव यांच्यावर टीका

 

प्रतिनिधी :- प्रशांत मोरजकर

 

सावंतवाडी, दि.१९:- ठाकरे गटाचे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी काल जी राणे कुटुंबावर खालच्या शब्दात कुडाळ मध्ये टीका केली त्याचा आम्ही निषेध करतो, भास्कर जाधव हा वाळू चोर आहे आणि भास्कर जाधव ह्यांनी स्वतःची मर्यादा ओळखूनच बोलाव अन्यथा आमच्याकडे पण भरपूर बोलण्यासारखं आहेत हे लक्षात ठेवाव अशा इशारा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी सावंतवाडीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतुन केला आहे.

भास्कर जाधव ह्यांचीराणे साहेबावर बोलण्याची कुवत नाही अशा शब्दात संजू परब यांनी भास्कर जाधव यांच्यावर टीका केली आहे. यावेळी अजय गोंदावळे, बंटी पुरोहित,अजय सावंत,श्री.भालेकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!