कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

मालवण ओझर-कातवड मार्गावर बसफेऱ्या सुरू करा

मालवण ओझर-कातवड मार्गावर बसफेऱ्या सुरू करा!

मालवण

मालवण- खैदा-कातवड-ओझर मालवण याप्रमाणे नवीन बस फेरी सुरू करावी, अशी मागणी कोळंब सरपंच सीया धुरी व उपसरपंच विजय नेमळेकर यांनी मालवण आगार आहे. व्यवस्थापकांकडे केली
यावेळी नंदा बावकर, स्वप्नील परब, निकिता बागवे, मारूती धुरी, पवार आदी उपस्थित होते. मालवण ते ओझर व्हाया कातवड या मार्गावर आपल्या आगारामधून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरु होण्यापूर्वी बसफेरी सुरु होती. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे बस
फेरी बंद करण्यात आली असून ती अद्यापपर्यंत सुरु करण्यात आली नाही. सद्यस्थितीत कातवड येथून सुमारे पंचवीस ते तीस शालेय विद्यार्थी, तसेच बहुतांश महिला भाजीपाला विक्रीसाठी, ज्येष्ठ नागरिक यांना दररोज मालवण ते कातवड असा प्रवास करतात असा प्रवास करताना सर्व प्रवाशांना खैदा किंवा ओझर या ठिकाणी जाताना किंवा येताना नियोजित स्थळी पोहचण्याकरिता सुमारे तीन ते चार कि. मी. चालत प्रवास करावा लागतो. ही गैरसोय टाळण्याकरीता सदर मार्गावर सकाळी, दुपारी व सायंकाळी बसफेरी सुरू करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!