कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

माजगाव सातेरी जत्रोत्सव ७ रोजी

माजगाव सातेरी जत्रोत्सव ७ रोजी

सावंतवाडी

जागृत देवस्थान तसेच लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले माजगावचे ग्रामदैवत श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार ७ जानेवारीला होत आहे. नवसाला पावणारी आणि माहेरवाशिणींची पाठीराखी अशी सातेरीची ख्याती असल्याने या जत्रोत्सवात भाविकांची अलोट गर्दी होते. यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर सातेरी देवीला भरजरी वस्त्र व सुवर्ण अलंकारांसह आकर्षक फुलांनी सजविण्यात येणार आहे. त्यानंतर देवस्थानच्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवीची मानाची ओटी भरल्यानंतर देवीच्या दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी होणार आहे. रात्री सवाद्य पालखी मिरवणुकीनंतर उशिरा पार्सेकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानचे मानकरी तसेच ग्राम देवस्थान निधी कमिटीचे अध्यक्ष आनंद सावंत, सचिव विजय माधव आणि माजगाव ग्रामस्थांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!