कोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

दिव्यांगांचे ओळखपत्र एसटी प्रवासात ग्राह्य धरणार

दिव्यांगांचे ओळखपत्र एसटी प्रवासात ग्राह्य धरणार

सावंतवाडी

अंध, अपंग, दिव्यांग व्यक्तींना एसटी सवलत प्रवासासाठी केंद्र शासनाकडून देण्यात आलेले ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. सद्यस्थितीत ज्या लाभार्थ्यांकडे सदरचे ओळखपत्र (यूडीआयडी) आहे, अशा लाभार्थ्यास प्रवास भाड्यात सवलत नाकारली जात असल्याच्या तक्रार आहेत. ४० टक्केपेक्षा जास्त अंपगत्व असणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांना प्रवास सवलतीसाठी केंद्र शासनाद्वारे देण्यात आलेले ओळखपत्र ग्राह्य धरण्यात यावे. सदर ओळखपत्र लाभार्थ्याकडे असताना वैद्यकीय प्रमाणपत्राची मागणी करू नये. तसेच ६५ टक्केपेक्षा जास्त अपंगत्व असणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांना साथीदारासह प्रवास करत असल्यास ओळखपत्राबरोबरच (यूडीआयडी) आगार व्यवस्थापक यांच्यामार्फत पत्र क्रमांक १ अन्वये देण्यात आलेला नमुना दाखला आवश्यक आहे. दिव्यांग लाभार्थ्यांना केंद्र शासनाने दिलेले ओळखपत्र ग्राह्य धरून अपंग लाभार्थ्यांना सहकार्य करावे, याबाबत स्पष्ट सूचना सर्व आगार प्रमुखांना दिल्याची माहिती नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंडचे अध्यक्ष अनंत उचगावकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!