सावंतवाडीत ५ पासून लोककला महोत्सव
सावंतवाडीत ५ पासून लोककला महोत्सव
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री पंचम खेमराज महाविद्यालय आणि संस्थेचे कार्यकारी विश्वस्त लखम सावंत-भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी राजवाडा येथील पटांगणात ५ ते ८ जानेवारी या कालावधीत दशावतार लोककला महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवात जिल्ह्यातील सात पारंपरिक दशावतार नाट्यमंडळाचे नाट्यप्रयोग होणार आहेत. दररोज दोन नाट्यप्रयोग होणार असून ८ जानेवारीला समारोप होणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता पहिला नाट्यप्रयोग, त्यानंतर रात्री ८.३० वाजता दुसरा प्रयोग होणार आहे. ५ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता लोककला महोत्सवाचे होणार आहे. उद्घाटन ५ जानेवारीला सायंकाळी ६.३० ते रात्री ८ या वेळेत चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ, चेंदवण यांचा ‘गौरी स्वयंवर’ हा नाट्यप्रयोग, त्यानंतर रात्री ८.३० ते १० या वेळेत वालावलकर दशावतार नाट्यमंडळ, ओसरगाव यांचा ‘वैध राहुचे… ग्रहण चंद्र सूर्याचे’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. ६ रोजी सायंकाळी ६.३० ते ८ या वेळेत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरुर यांचा ‘कर्ण पिशाच्च अर्थात अर्धसत्य’ हा नाट्यप्रयोग, त्यानंतर रात्री ८.३० ते १० या वेळेत खानोलकर दशावतार नाट्य मंडळ (खानोली) यांचा ‘पालीचा बल्लाळेश्वर’ हा नाट्यप्रयोग होणार आहे.

