मुंबई ते कन्याकुमारी विशेष एक्सप्रेस..
मुंबई ते कन्याकुमारी विशेष एक्सप्रेस
कणकवली
गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर सीएसएमटी – कन्याकुमारी सीएसएमटी व एलटीटी कन्याकुमारी – एलटीटी अशा दोन विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. दोन्ही गाड्यांना सिंधुदुर्गातील काही स्थानकांवर थांबा आहे. सीएसएमटी कन्याकुमारी ५ जानेवारीला दुपारी ३.३० वा. सीएसएमटी येथून सुटेल व दुसऱ्या दिवशी रात्री ११.२० वा. कन्याकुमारी येथे पोहोचेल. कन्याकुमारी सीएसएमटी ७ जानेवारीला दुपारी २.१५ वा. कन्याकुमारी येथून सुटेल व दुसऱ्या दिवशी रात्री ९.५० वा. सीएसएमटी येथे पोहोचेल. गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण,रत्नागिरी, कणकवली (रात्री ११.३० व स. १०.४६), सिंधुदुर्ग, सावंतवाडी, मडगाव, कारवार, उडपी, मेंगलोर, कन्नूर, एर्नाकुलम, नागरकोईल आदी स्थानकांवर थांबा आहे. एलटीटी कन्याकुमारी १२ व १९ जानेवारीला दुपारी ३.३० वा. एलटीटी येथून सुटेल व दुसऱ्या दिवशी रात्री ११.२० वा. कन्याकुमारी येथे पोहोचेल.
कन्याकुमारी एलटीटी १४ व २१ जानेवारीला दुपारी २.१५ वा. कन्याकुमारी येथून सुटेल व दुसऱ्या दिवशी रात्री ९.५० वा. एलटीटी येथे पोहोचेल. गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्गनगरी, सावंतवाडी, मडगांव आदी स्थानकांवर थांबा असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

