कोकणक्राइममहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

क्रिकेटपटू ऋषभ पंत रस्ते अपघातात जखमी

क्रिकेटपटू ऋषभ पंत रस्ते अपघातात जखमी

देहराडून

भारतीय संघाचा स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंत शुक्रवारी पहाटेच्या सुमारास दिल्ली-देहराडून महामार्गावर एका भीषण अपघातात जखमी झाला. अपघातानंतर त्याला उत्तराखंडमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कार दुभाजकाला धडकल्यानंतर वाहनाची काच फोडून बाहेर पडण्यात यशस्वी झाल्यामुळे ऋषभ सुदैवाने बचावला. या अपघातानंतर अनेक दिग्गजखेळाडूंनी ट्विट करून पंतला लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.उत्तराखंडमधील रुरकी येथे पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ऋषभ पंतच्या कारला अपघात झाला. या घटनेनंतर त्याच्या मर्सिडीज कारला आग लागून ती भस्मसात झाली. या घटनेदरम्यान घटनास्थळावरून जाणाऱ्या रोडवेज बसच्या चालक आणि वाहकाने ऋषभचे प्राण वाचवले. अपघाताच्या वेळी याच मार्गावरून जाणाऱ्या काही लोकांनी तातडीने ऋषभ पंतच्या प्राथमिक उपचाराची व्यवस्था
केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!