कसाल सरपंच पदी राजन रामचंद्र परब तर उपसरपंच शंकर गणपत परब यांनी पदभार स्वीकारला
कुडाळ तालुक्यातील कसाल सरपंच राजन रामचंद्र परब तर उपसरपंच शंकर गणपत परब यांनी पदभार स्वीकारला आहे. उपसरपंच पदाची निवडणूक सरपंच राजन परब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संदीप कोरगावकर यांनी काम पाहिले .
यावेळी राजन परब म्हणाले यापुढे सर्वांना विश्वासात घेऊन काम केल जाईल सर्व ग्रामपंचायत सदस्यांना योग्य मानसन्मान दिला जाईल. ग्रामपंचायत सदस्यांनी मतदारांपर्यंत सर्व शासकीय योजनाचा पोहचवायचे आहेत सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत.या सर्व योजनांचा लाभ गावातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहचला पाहिजे . तसेच बचत गटांच्या माध्यमातून गावातच रोजगार तयार करण्यासाठी प्रयत्न केले जातील त्यामुळे गावातील बेरोजगारांचे हाताला गावातच काम मिळेल . यावेळी गावातील सर्व मतदारांचे राजन परब यांनी आभार मानले.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य गोपाळ हरमलकर, बापू पाताडे माजी उपसरपंच बाबू मळगावकर माजी सरपंच निलेश कामतेकर माजी सरपंच निलिमा वाढकर संगिता परब कसाल ग्रामविकास अधिकारी सौ एस बी कोकरे ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.