कणकवलीकोकणमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

केंद्राच्या निरीक्षकांकडून हायवे कामाची पाहणी

केंद्राच्या निरीक्षकांकडून हायवे कामाची पाहणी

कणकवली

एकीकडे ओसरगाव येथील टोलमुक्तीसाठी कृती समिती स्थापन होत लढा उभारण्यात येत असतानाच दुसरीकडे महामार्गाच्या कामाबाबतही तक्रारी होत आहे. मुंबई – गोवा महामार्गाचे सिंधुदुर्गमधील काम बऱ्यापैकी झालेले असले तरीही इतर जिल्ह्यांतील कामे प्रलंबित आहेत. या कामांच्या पाहणीसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनेनुसार निरीक्षक म्हणून आलेल्या श्री. थिंग यांनी सिंधुदुर्गमधील हायवेच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी एस. एम. हायस्कूलनजीकच्या बॉक्सेलच्या कामाचीही पाहणी केली. केंद्र शासनाकडून निरीक्षक म्हणून आलेल्या श्री. थिंग यांनी संपूर्ण मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत मुख्य अभियंता श्री. शेलार, कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव, उपअभियंता महेश खटी, श्री. शिवनीवार व इतर अधिकारी उपस्थित होते. महामार्गाचे काम. दर्जाबाबत अनेक ठिकाणी तक्रारी आहेत. आपल्याकडे काम बऱ्यापैकी झालेले असले तरीही काही जिल्ह्यांत कामे थांबलेली आहेत. ही कामे सुरू करण्यात असलेल्या अडचणी, कामाच्या दर्जा याबाबतच्या पाहणीसाठी हा दौरा करण्यात आला. या पाहणी दौऱ्यानंतरचा अहवाल गडकरी यांना सादर करण्यात येणार असल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!