बेळगाव-वेंगुर्ले मार्गाची खड्डड्यांमुळे दुरवस्था
बेळगाव-वेंगुर्ले मार्गाची खड्डड्यांमुळे दुरवस्था
सावंतवाडी
आकेरी नेमळे घाटी ते कामळेवीर बाजारपेठेदरम्यान बेळगाव- वेगुर्ले मुख्य महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. या खड्डेमय रस्त्यावर शाळकरी मुले तसेच वाहनचालकांचे वारंवार अपघात घडतात. यासाठी कामळेवीर व नेमळे ग्रामस्थांनी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ तसेच नेमळे सरपंच दीपिका भैरे यांनी कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांना निवेदन देऊन लक्ष वेधले होते. या महामार्गावरील ब्रिटिशकालीन जीर्ण पुलांची दुरुस्ती करावी, अशी मागणी रुपेश राऊळ व ग्रामस्थांनी केली. यावेळी माजी सभापती बाळा गावडे, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, बाळा पाटकर, तेंडोलकर, बंड्या मांजरेकर, महेश तेंडोलकर, तुकाराम वाघाटे, तंटामुक्ती अध्यक्ष सखाराम राऊळ, श्याम करंगुटकर उपस्थित होते.

