आरोंदा दाखाडीतून बेसुमार वाळू उपसा महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष
आरोंदा दाखाडीतून बेसुमार वाळू उपसा महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष
आरोंदा –
तेरेखोल शितेपूवाडी तसेच सावरजुवा आरोंदा खाडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत,महसुल विभाग याकडे लक्ष देणार का?की तेंचेही हात बरबटलेले आहेत असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे.
आरोंदा शिपेतूवाडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळू माफिया वाळूची तस्करी करत आहे, शासकीय अधिकारी, ग्रामस्थ यांना न जुमानता दांडगाईने ही वाळू उपसा गेले अनेक महिने सुरु असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे व याला महसुल अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याचे बोलले जाते. याबाबत सावंतवाडी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांनी जातीनिशी लक्ष घालून कडक कारवाई करावी अशी मागणी जोर धरु लागली आहे..

