कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

फणसवडे मल्लनाथ देवस्थानचा जत्रोत्सव २९ रोजी

फणसवडे मल्लनाथ देवस्थानचा जत्रोत्सव २९ रोजी

ओटवणे

फणसवडे गावचे ग्रामदैवत श्री देव
मल्लनाथ देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव २९ डिसेंबर रोजी होणार आहे. अति दुर्गमस्थान असूनही हजारो भाविक यादिवशी मल्लनाथ चरणी नतमस्तक होतात. यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर नवस बोलणे, नवस फेडणे, माया देवीची ओटी भरणे, नारळ ठेवणे आदी कार्यक्रम होणार आहेत. सवाद्य पालखी सोहळ्यानंतर जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ आरोस-दांडेलीचे नाटक होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानचे मानकरी आणि फणसवडे ग्रामस्थांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!