अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेचा सव्वा दोन लाख प्रवाशांकडून लाभ
अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेचा सव्वा दोन लाख प्रवाशांकडून लाभ
कणकवली
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवासासाठी शासनाने अमृत ज्येष्ठ नागरिक योजना सुरू केली. एसटी महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागातून या योजनेंतर्गत नोव्हेंबरपर्यंत २ लाख २१ हजार ४५१ ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास केला आहे. शासनाचा निर्णय व लालपरीतील या प्रवासाला ज्येष्ठांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
२६ ऑगस्टपासून ही योजना सुरु झाली. त्यानंतर या योजनेला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नोव्हेंबर महिन्यात सावंतवाडी आगारातून १७,९२९, वेंगुर्ले आगारातून ७,९५९, कुडाळ आगारातून ११,८२५, मालवण आगारातून ११,७४४, कणकवली आगारातून १९,०३४ देवगड आगारातून १२,९५४, विजयदुर्ग आगारातून ६,४१४ असे एकूण ८७,८५९ ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास केला. विशेष म्हणजे या योजनेची जनजागृती होण्याकरिता एसटीच्या सिंधुदुर्ग विभागातील सर्व आगारांमध्ये बॅनर्स लावण्यात आले आहेत.
अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेंतर्गत एसटीच्या शिवशाही बसेसमधून सप्टेंबरमध्ये ४, ऑक्टोबरमध्ये १०, नोव्हेंबरमध्ये २३ असे एकूण ३७ ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास केला आहे.
