शैक्षणिकसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय व रोटरी क्लब सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने धन्वंतरी जयंती व राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि.१४: पाचवा राष्ट्रीय आयुर्वेद दिन तथा धन्वंतरी जयंती निमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. यात धन्वंतरी पूजन करण्यात आले. आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब पाटील यांनी धन्वंतरी पुजन केले. तसेच महाविद्यालयास संलग्न रुग्णालयात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईक यांच्यासाठी विविध विषयांवर तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन तथा समुपदेशन सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर रोटरी क्लब सावंतवाडी आणि आयुर्वेद महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने, कोविड-१९ आणि आयुर्वेद या संकल्पनेवर आधारित आयुर्वेद औषध निर्माण तज्ञ डॉ. महेश इनामदार, एम डी (आयु). यांचे ऑनलाइन व्याख्यान आयोजित करण्यात आले.

या प्रसंगी प्राचार्य डॉ. बाबासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक सादर केले. रोटरी क्लब चे अध्यक्ष डॉ. राजेश नवांगुळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कोरोना रुग्णांची आयुर्वेदिक औषधी चिकित्सा आणि त्यात उपयुक्त आयुर्वेद कल्प यांचे विषयी डॉ. महेश इनामदार यांनी विस्तृत विवेचन केले. या ऑनलाईन व्याख्यानास महाविद्यालयाचे अध्यापक, अध्यापकेतर कर्मचारी, रुग्णालयीन कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी उपप्राचार्य डॉ. संजय दळवी, डॉ. राजेंद्र पाटील आणि डॉ. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. रवी गोळघाटे यांनी सहकार्य केले.

रोटरी क्लब सावंतवाडी आणि आयुर्वेद महाविद्यालय यांचे वतीने आगामी काळात अनेक सामाजिक आणि आरोग्य विषयक उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

*_🪔आता दिवाळीच्या मुहूर्तावर🎊फक्त १ रुपया द्या! आणि नवीन फ्रिज, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन घेऊन जा! तिही बजाज फायनान्सच्या 0% व्याज दरासह!💰_*

*🔥बिजली इलेक्ट्रॉनिक्स सावंतवाडी🔥*

*_🤷🏻‍♂️घेऊन आले आहेत!दिवाळी निमित्त कोणत्याही खरेदीवर आकर्षक भेटवस्तू अगदी मोफत!🎁_*

*💥🔥आमचा दिवाळी धमाका🔥💥*
💫एलईडी टीव्हीच्या खरेदीवर 4.1 होम थिएटर मोफत..
💫जुन्या कोणत्याही चालू किंवा बंद टीव्हीवर 5000/- ते 10,000/- पर्यंत सूट..
💫फ्रीजच्या खरेदिवर कुलर किंवा मिक्सर मोफत..
💫जुन्या कोणत्याही चालू किंवा बंद फ्रिजवर 5000/- ते 7000/- पर्यंत सूट..
💫एसीच्या खरेदीवर 30% सूट..
💫बजाज फायनान्स कडून सुलभ हप्त्याची कर्ज सुविधा तिसुद्धा 0% व्याज दरात..

_*🌈टीप:* (अटी-शर्ती लागू, ऑफर ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत मर्यादीत)_

*🏬आमचा पत्ता:*
लतालॉज कॉर्नर, मुख्य बाजारपेठ-मेन रोड, हॉटेल मॅंगो समोर, सावंतवाडी.
*_📱9422055122_*
*_📱8983805122_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!