बांदेकर मेडिकलचे मालक विद्यानंद उर्फ नंदू बांदेकर यांचे निधन
सावंतवाडी येथील बांदेकर मेडिकलचे मालक विद्यानंद उर्फ नंदू बांदेकर यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले.काल त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना रात्री गोवा येथे उपचारासाठी हलवण्यात आले होते. मात्र, आज सकाळी उपचार घेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने सर्वत्र बाजारपेठेत हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,भाऊ, बहीण असा परिवार आहे.

