सावंतवाडी नगर परिषदेचे विरोधी गटाचे पाच नगरसेवक सत्ताधाऱ्यांच्या गळाला..
🛑निवडणुकीच्या तोंडावर प्रवेश झाल्यास शिवसेनेला मोठा धक्का
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ ब्यूरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी- येथील नगर परिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत, जसजशी निवडणूक जवळ येत आहे तस तसे या निवडणुकीला रंग चढणार एवढे मात्र निश्चित, सध्या सावंतवाडी शहरात सत्ताधार्यांना विरोधी गटातील पाच नगरसेवक गळाला लागल्याचे वृत्त आहे, त्या पाच नगरसेवकांना निवडणूक लढण्यासाठी वीस लाखांची ऑफर देण्यात आल्याचे समजते.
कोणत्याही परिस्थितीत सावंतवाडी नगरपरिषद हातची जाऊ द्यायची नाही असा चंग केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बांधला असून त्यादृष्टीने नगराध्यक्षना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.
विरोधी गटातील सात नगरसेवक हे अनुभवी असल्याने त्यांना सत्ताधारी गटाकडून आपल्या भाजपमधून निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात आली आहे. ही ऑफर देताना निवडणूक खर्चासाठी पंधरा लाख व प्रवेश केल्यावर पाच लाख अशी अट असल्याचे समजते.ऋ या पैकी पाच नगरसेवक हो ना हो ना च्या भूमिकेत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे पाच नगरसेवकांनी भाजप मध्ये प्रवेश केल्यास शिवसेनेला तो मोठा धक्का मानला जाणार आहे, त्यामुळे आमदार केसरकर यांनी ही सर्व नगरसेवकांना बोलावून घेऊन तुम्ही कामाला लागा तुमची उमेदवारी निश्चित आहे असे सांगितल्याचे समजते, ते आगामी काळात नेमके काय करणार आहे हे येणारा काळच ठरवणार आहे.
________________________
*😍खुषखबर…खुषखबर… खुषखबर…😍*
_आपकी जरुरत हमारी जिम्मेदारी_
*🌐कणकवली शहरात भारत फायबर कनेक्शन लवकरच सुरु…कणकवली तालुक्यासाठी BSNL चे फायबर इंटरनेट तेही आपल्या घरोघरी..🏬*
*☎️कनेक्शन घ्या आणि सोबत Landline connection २४ तास फ्री!!त्वरा करा*
*▪️आमची वैशिष्ट्ये*
• वाजवी किंमतीमध्ये इंटरनेट सुविधा
• 30 MBPS व त्याहून अधिक स्पीड
• आपल्या आवश्यकतेनुसार विविध प्लँन्स
• अनलिमिटेड व्हाईस काँलिंग
• अँन्ड्राईड टी.व्ही वर सर्व चँनेल पाहता येतात
• ग्रामीण भागातही इंटरनेट सुविधा
• जुने फायबर कनेक्शन कमी
• किंमतीत बीएसएनएल मध्ये करुन घ्या
• जुन्या नंबरावरील सर्व काँल्स नवीन नंबरवर ट्रान्सफर करता येतात
• नियमीत सेवेसाठी यंत्रणा
*अधिक माहितीसाठी संपर्क:-*
02367-232020
9422925050
9420271818
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

