सावंतवाडीत दिवाळी निमित्त दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक वस्तू व रोख रक्कम देऊन मदतीचा हातभार..
▪️ दानशूर व्यक्ती व सामाजिक संस्था एकत्र येऊन जोपासली सामाजिक बांधिलकी..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि.१३: दिपावली निमित्त सावंतवाडीतील दानशूर व्यक्तीमत्व श्री. अमित वेगुर्लेकर यांनी सामाजिक बांधीलकीच्या नात्याने २० दिव्यांग घटकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करुन समाजासमोर एक आदर्श निर्माण करीत धान्य व जीवनावश्यक वस्तूंची भेट दिली. त्यांच्या या समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या आणि दानशूर दातृत्वाचा अभिमान वाटावा असे काम करुन दिव्यांग घटकांना दिलेली मदत ही नव्या पिढीसमोर नव्या दमाच्या या तरुण नेतृत्वाने आपल्या कार्याने ठसा उमटविला. यावेळी दिव्यांग घटक हरी गांवकर, हरीश्चंद्र राऊळ, विठ्ल शिरोडकर, आत्माराम परब, सत्यवान वारंग, बाळकृष्ण आरोलकर, सुरेखा शिरोडकर, जयेद्रथ राऊळ, शंकुतला पणशीकर, पूजा मेस्री, प्रभावती पणशीकर, श्री. व सौ. सामंत, सुरेश दामले, उदय पराष्ठेकर, लता चव्हाण, समीर गवंडे, लीनता वस्त, शंकर मांजरेकर, विमल नेरुरकर, माधूरी मेस्त्री, रमेश गवंडे, संजय पडवळ आदी सर्व दिव्यांग निराधार महीला उपस्थित होते.
शहराचे माजी नगरसेवक सुनील पेडणेकर यांनी अमित वेगुर्लेकर यांचा आदर्श समाजातील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी राजकीय सामाजिक सहकारी वैद्यकीय शैक्षणीक संघटना व त्यांच्या पदाधिकारी तसेच शिक्षक प्राध्यापक डाँक्टर, वकील व वरीष्ठ अधिकारी आमदार, खासदारांनी घेतल्यास समाजापासून दुर्लक्षीत असलेल्या दिव्यांगाच्या जीवनातील अंधकार व आर्थिक दृष्ट्या असलेली दुर्बलता दूर करण्यास हातभार लागेल.
श्रीमंत व्ही.आय.पी. आपल्या नातेवाईक नोकरदार व भरपूर संपत्ती असलेल्या मंडळीना दिपावली गिप्ट देण्याचा रिवाज बदलून गरजवंत दिव्यांग निराधार अनाथ गरीब घटकांना दिपावली गिप्ट समाजात रुजविण्याचा नवा संकल्प सामाजिक कार्यकर्ते अमित वेगुर्लेकर यावर्षीच्या दिपावली निमित्त केला आहे. त्याचे सुनील पेडणेकर यांनी कौतुक करुन सावंतवाडी नागरी कृती संघर्ष समिती व श्री महालक्ष्मी दिव्यांग व निराधार संघटनेमार्फत अमित वेगुर्लेकर यांचे अभिनंदन केले आहे.
या धान्य व जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यासाठी अँड संजू शिरोडकर ग्लोबल सेवाभावी चँरीटेबल ट्रस्ट पिंगुळी-कुडाळ, साईनाथ मुंज आदी दानशूर व्यक्तीनीही मदतीचा हातभार लावलेला असून सौ. सुश्मीता नाईक, सौ. नीता पेडणेकर यांनी प्रत्येकी १०००/- रुपयांची मदत दिव्यांगाना दिली आहे. त्यांचेही आभार यावेळी सुनील पेडणेकर यांनी मानले आहे.
अशी दिपावली भेट गरजू दिव्यांग निराधारांना देऊ इच्छिणाऱ्या समाजातील दानशूर व्यक्तीनी श्री महालक्ष्मी दिव्यांग व निराधार सामाजिक संघटना सिंधुदुर्ग कार्यालय सावंतवाडी मोबाईल क्रमांक 9421016891 येथे संपर्क साधावा. गरजू अडचणीत असलेल्या दिव्यांगाना तुमच्या मदतीची गरज आहे. आपल्या आनंदात या घटकांनाही आनंदी ठेवण्यासाठी मदत करा. असे आवाहन माजी नगरसेवक सुनील पेडणेकर यांनी केले आहे.
*💥धमाका ऑफर.. धमाका ऑफर.. धमाका ऑफर..💥*
_🔥राऊत आणि कंपनी, रोवस्त्र, राऊत क्लाँथ सेंटर दिवाळी साठी कपड्यावर घेऊन आले आहे! खास धमाका ऑफर……!💥_
*💥😍 दिवाळी धमाका ऑफर 😍💥*
*🔥राऊत क्लाँथ सेंटर*
_ड्रेस मटेरिअल, टाँप, जिन्स_
फक्त ₹ १९९ पासून ड्रेस मटेरियल उपलब्ध..
*🔥रोवस्त्र*
_टि-शर्ट, शर्ट, जिन्स, जाँगर्स आणि हुडीस_
५० टक्के आँफ..💰
*🔥राऊत आणि कंपनी*
_साडी, सुटींग, शर्टींग_
₹ ९९ पासून साड्या उपलब्ध;
२० टक्के पर्यत सुट..💰
🏃🏻♂️चला तर वेळ का घालवता? आज भेट द्या! आणि लाभ घ्या! दिवाळीच्या धमाका ऑफर्स चा..🏃🏻♀️
*🔮 आमचा पत्ता 🤷🏻♂️*
*_🏬 भाट बिल्डींग, सावंतवाडी_*
*_📱संपर्क : 9156992364_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

