चोरट्यांची टोळी जिल्ह्यात कार्यरत.
*🟥चोरट्यांची टोळी जिल्ह्यात कार्यरत*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कणकवली, दि.१४डिसेंबर:*
परप्रांतातून आलेल्या काही चोरट्यांनी मंगळवारी कणकवलीत आठवडा बाजाराची संधी साधून अक्षरश: धुडगूस घातला. दिवसभरात आप्पासाहेब पटवर्धन चौक, बसस्थानक, स्टेट बँकेनजीक अशा बऱ्याच ठिकाणी अनेकांची पाकिटे, पर्स चोरीला जाण्याचे प्रकार घडले. याबाबत पोलिसांनी एका महिलेसह अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले होते. पुढे नोटीस वगैरे कारवाईनंतर महिलेला सोडण्यात आले. पण, भिकारी असल्याचा दिखाऊपणा करीत चोरट्यांची ही मोठी टोळी जिल्हयात उतरल्याचा अंदाज नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
मंगळवारी सकाळच्या सुमारास आप्पासाहेब पटवर्धन चौकानजीक एकाचे पाकीट चोरताना साधारण दहा वर्षीय मुलगा रंगेहाथ सापडला. मुलगा पाकीट टाकून पळण्याच्या बेतात पळत असताना काहींनी त्याला पकडून कणकवली पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यावेळी मुलासमवेत एक महिलाही असल्याचे दिसून आले. चौकशीअंती महिला व मुलाला सोडून देण्यात आले. सकाळच्याच सुमारास येथील स्टेट बँकेनजीकही एकाच्या खिशातील रक्कम चोरी गेल्याची चर्चा होती.
दरम्यान, सायंकाळच्या सुमारास सुवर्णा सूर्यकांत परुळेकर (६५, ओटव) या मालवणला जाण्यासाठी पुणे मालवण बसमध्ये चढल्या. बसमध्ये बसल्यानंतर आपल्याकडील मोठ्या पर्समध्ये असलेली छोटी पर्स चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. पर्समध्ये १५०० व रुपये महत्वाची कागदपत्रे होती. बसस्थानका मधील सीसीटीव्ही तपासणीत काही मुले व महिला आढळून आली. यातीलच एकाने सुवर्णा या बसमध्ये चढत असताना त्यांची पर्स चोरली होती. याबाबत सुवर्णा तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या.साधारण डिसेंबरच्या सुमारास जिल्ह्यात अशी महिला व लहान मुलांची टोळी दाखल होत असते. विशेषतः आठवडा बाजार लक्षात घेऊन ही टोळी कार्यरत राहते. पोलिसांनी कारवाई केली असता आपण भिकारी असल्याचा दिखाऊपणा त्यांच्याकडून केला जातो. पोलिसांनी त्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*📣भव्य सेल…!!📣भव्य सेल…!!📣भव्य सेल…!!📣*
*महागाईने त्रस्त..!🤒 इथे सर्व स्वस्त..!🤩*
_🏠गृहउपयोगी वस्तुंचा खजिना…🎁_
*ज्या वस्तूंची किंमत बाजारात 100/- ते 250/- रू. पर्यंत आहे त्या वस्तु फक्त 40/-हून अधिक*
_कोणतीही वस्तू…🥳हजारो व्हरायटीज🤩_
पुजा सामान, किचन वेअर, क्लिनिंग किट, टॉईज, सॅनेटरी वेअर, गिफ्ट आयईटमस्, एअरटाइट कंटेनर, डोअर मॅट, ऑफिस आईटमस्, प्लास्टिक नॉव्हेल्टीज, स्टेनलेस-स्टीलच्या वस्तू, मेलामाईन/चायना प्लेट
*📦वस्तूंचा उत्तम दर्जा, कमी किंमतीत हेच आमचे ध्येय…💰*
_फक्त काही दिवसांकरिता_
*🥳सुपर सेल🥳*
*🎴पत्ता:-* सार्वजनिक गणेश हॉल, जून्या पंचायत समिती शेजारी, सालईवाडा, सावंतवाडी.
*⏰वेळ:-* सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत
*📌टिप:-* कृपया प्रदर्शनाला भेट देतेवेळी कॅरी बॅग आणावी.
___________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

