कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

रवींद्रनाथ मुसळे यांच्या अपघाती मृत्यु प्रकरणी सखोल चौकशी करा

*रवींद्रनाथ मुसळे यांच्या अपघाती मृत्यु प्रकरणी सखोल चौकशी करा*

*मुख्याधिकारी, पोलिसांना शिवसेना नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर यांचे निवेदन; संबंधितांवर गुन्हा दाखल करा*

कणकवली (प्रथमेश जाधव) कणकवली नगरपंचायत व ठेकदार यांच्यामार्फत कणकवली रेल्वे स्टेशन येथे राज्यमार्ग १८१ कनेडी फोंडा या मार्गावर १२ फुट खोलीचे गटार खोदण्यात आले आहे. गेले तीन दिवस गटार खोदाईचे काम सुरु आहे. सदर रस्त्यावरून हे गटार जात असल्याने रस्ता देखील १२ फुट खोल खोदण्यात आला आहे. मात्र य मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही काळजी घेतलेली नसल्याने अथवा बॅरिकेट देखील लावले नाहीत. त्यामुळे कणकवली शहरातील विद्यानगर येथील रविद्रनाथ वसंत मुसळे वय ६९ हे रविवारी ११ डिसेंबर २०२२ त्या रत्यावरून दुचाकीने जात असताना खोदलेल्या गटाराचा त्यांना अंदाज न आल्याने गटारात पडून ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अपघाताच्या धक्यातून न सावरलेल्या रविंद्रनाथ मुसळे यांचा सोमवारी १२ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ०८ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. रविद्रनाथ मुसळे यांच्या अपघाती मृत्यु प्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुख्याधिकारी, पोलिसांना शिवसेना नगरसेवकानी निवेदन देत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी नगरसेवक कन्हैया पारकर, गटनेते सुशांत नाईक, नगरसेवक रुपेश नार्वेकर, शहराध्यक्ष उमेश वाळके आदी उपस्थित होते.
रवींद्रनाथ मुसळे हे कणकवली रोटरी क्लब पदाधिकारी, कणकवली कंझ्युमर्स सोसायटीचे संचालक, गोपुरी आश्रमचे पदाधिकारी होते. शहरातील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे योगदान होते. समाजोपयोगी उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच सहभाग असाचाय. कणकवली रोटरी क्लबच्या व्हाईस प्रेसिडेंस म्हणून पुढील वर्षाकारिता त्यांची नुकतीच नियुक्त करण्यात आली होती. कणकवली नगरपंचायत प्रशासन व ठेकेदार यांच्या बेजाबाबदार पणामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला. कणकवली शहरातून जाणाऱ्या राज्यमार्ग १८१ कनेडो फाँडा या मार्गांच्या खोदाईचे काम करताना वाहुकीच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करणे आवश्यक होते. काम पूर्ण होईपर्यंत सदर रस्ता बंद करून पर्यायी व्यवस्था करणे सरजेचे होते. त्याठिकाणी वाहतूक पोलीस तैनाद करणे गरजेचे होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!