कोकणक्राइममहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

परप्रांतीय चोरट्याला ग्रामस्थांनी ‘रंगेहाथ पकडले

परप्रांतीय चोरट्याला ग्रामस्थांनी ‘रंगेहाथ पकडले

बांदा

मध्यरात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास बांदा शहरातील निमजगावाडी येथील महादेव सावंत यांच्या घरात चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या परप्रांतीय चोरट्याला घरमालक सावंत यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. सोमवारी दिवसभरात घरात शिरून चोरीचा प्रयत्न करण्याची दुसरी घटना शहरात घडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, तो मानसिक रुग्ण असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी जबाब नोंदवून त्याची रवानगी आश्रमात केली.

याबाबतसविस्तर माहिती अशी की,
शहरातील निमजगावाडी येथे
मध्यरात्री साडेतीन वाजता सावंत यांच्या घरात अज्ञात व्यक्ती शिरला. घरमालक सावंत यांनी शिताफीने त्याला पकडले. यावेळी चोरट्याने सावंत यांना मारहाण देखील केली. झटापट झाल्याने सावंत यांच्या घराशेजारी राहत असलेले कुबल यांनी धाव घेत चोरट्याला दोरीच्या साहाय्याने बांधून ठेवले. आवाज ऐकून लगत राहत असलेले ग्रामस्थ वासुदेव भोगले, विशाल भोगले, विलास भोगले, विकी सावंत, शिवराम बहिरे, संजय सावंत यांच्यासह ग्रामस्थांनी धाव घेतली. ग्रामस्थांनी चोरट्याला पकडून बांदा पोलिसांच्या स्वाधीन केले. सोमवारी सकाळी भर दिवसा शहरात सदनिका फोडून परप्रांतीय कामगाराकडून चोरीचा प्रयत्न झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!