सावंतवाडीत २४ रोजी कथाकथन स्पर्धा
सावंतवाडीत २४ रोजी कथाकथन स्पर्धा
सावंतवाडी
श्रीराम वाचन मंदिरतर्फे २४ डिसेंबरला साने गुरुजी जयंतीनिमित्त कथाकथन स्पर्धेचे आयोजन केले आहे. माजी नगराध्यक्ष दत्ताराम वाडकर यांनी संस्थेकडे ठेवलेल्या ठेवीच्या व्याजातून स्पर्धेचे आयोजन केले जाते. स्पर्धा सावंतवाडी तालुक्यातील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांपुरती मर्यादित आहे. स्पर्धा शनिवार २४ डिसेंबरला सकाळी १० वाजता श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी येथे सुरू होईल. स्पर्धेसाठी कोणत्याही संस्कारमय कथेची निवड करावी. स्पर्धकाला पाच मिनिटे वेळ दिला जाईल. स्पर्धा आटोपल्यावर त्याच ठिकाणी बक्षीस वितरण समारंभ होईल. प्रत्येक शाळेतून प्रत्येक गटातून दोनच स्पर्धक विद्यार्थ्यांना भाग घेता येईल. स्पर्धकांची नावे स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास अगोदरपर्यंत स्वीकारली जातील.

